ठाणे :उड्डाणपुलाच्या उदघाटनाच्या वेळी राष्ट्रवादी आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल (molestation case against Jitendra Awhad) करणाऱ्या, तथाकथित समाजसेविका रिदा रशीद यांच्यावर पिटा अंतर्गत गुन्हा दाखल झालेला (case registered against Rida Rashid) आहे. मुंब्रा पोलीस अधिक तपास करीत आहेत.
Rida Rashid : रिदा रशीद यांच्यावर पिटा अंतर्गत गुन्हा दाखल ; आव्हाडांवर विनयभंग गुन्हा दाखल करणारी महिला - आव्हाडांवर विनयभंग गुन्हा दाखल करणारी महिला
समाजसेविका रिदा रशीद यांच्यावर पिटा अंतर्गत गुन्हा दाखल झालेला (case registered under PITA against Rida Rashid) आहे. त्यांनी जितेंद्र आव्हाडांवर विनयभंगाचा गुन्हा दाखल केला (molestation case against Jitendra Awhad) होता. त्यांची परिसरात समाजसेविका म्हणून ओळख आहे.
गुन्हा दाखल : आरोपी रिदा रशीद या मुंब्रा परिसरात समाजसेविका म्हणून वावरत (case registered under PITA against Rida Rashid) आहे. त्यांच्याकडे घटस्फ़ोटित महिला नोकरीसाठी गेल्या असता त्यांना हॉटेलमध्ये गैरकृत्य करण्यास पाठविण्यात आल्याची तक्रार महिलेने मुंब्रा पोलीस ठाण्यात केल्यानंतर मुंब्रा पोलिसांनी फिर्यादी महिलेच्या तक्रारीवरून तथाकथित समाजसेविका रिदा रशीद यांच्यावर मुंब्रा पोलीस ठाण्यात गुन्हा रजि. १२०४ भादंवि ३७०(ए), पॉक्सो अंतर्गत कलम ४, १०, ६, आणि १२ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. याबाबत वरिष्ठ पोलीस निरीक्षक कडलग यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी दुजोरा दिला. मात्र या प्रकरणात तपास करीत असल्याचे (Rida Rashid molestation case against Awhad) त्यांनी सांगितले.