महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

कायद्याचे रक्षकच बनले भक्षक, नवी मुंबईतील मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी पुण्याच्या पोलीस महानिरीक्षकावर गुन्हा दाखल - मोटर ट्रान्सपोर्ट, पुणे

तळोजा परिसरात राहणाऱ्या एका 17 वर्षीय मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी पुण्याचे पोलीस महानिरीक्षक निशिकांत मोरे याच्याविरुद्ध तळोजा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

पोलीस महानिरीक्षक निशिकांत मोरे
पोलीस महानिरीक्षक निशिकांत मोरे

By

Published : Dec 26, 2019, 11:45 PM IST

Updated : Dec 27, 2019, 7:35 AM IST

नवी मुंबई - तळोजा परिसरात राहणाऱ्या एका 17 वर्षीय मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी पुण्याचे पोलीस महानिरीक्षक निशिकांत मोरे (मोटर ट्रान्सपोर्ट, पुणे) याच्याविरुद्ध तळोजा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. कायद्याचे रक्षकच भक्षक बनत चालल्याची चर्चा नागरिकात होत आहे.

बोलताना पीडित मुलीचे वडील

याबाबत अधिक माहिती अशी, अल्पवयीन पीडितेच्या पालकांचे खारघर येथे एक कपड्याचे दुकान आहे. त्यांच्या या दुकानाशेजारी पोलीस महानिरीक्षक निशिकांत मोरे याच्या पत्नीचे ब्यूटी पार्लर आहे. त्यामुळे दोघांच्या कुटुंबीयांमध्ये ओळख झाली. त्यानंतर एकमेकांच्या घरगुती कार्यक्रमात येणे-जाणे वाढले. जून महिन्यामध्ये पीडितेचा वाढदिवस होता. त्यावेळी निशिकांत मोरे त्यांच्या घरी गेले. तेथे त्याने पीडितेच्या तोंडाला लागलेला केक विचित्र पद्धतीने काढला. त्यावेळी पीडितेला लज्जा वाटेल, अशा पद्धतीने स्पर्श करू लागला. पीडितेने प्रतिरोध केल्यानंतरही त्याने जबरदस्ती केली. तद्पूर्वी पीडित मुलगी निशिकांत मोरे यांच्या मुलासोबत खेळण्यासाठी त्यांच्या घरी जात होती. त्यावेळीही अनेकदा मोरे पीडितेशी लगट साधण्याचा प्रयत्न केल्याचे मुलीने जबाबात म्हटले आहे.

हेही वाचा - दुकानात चप्पल दाखवण्याच्या बहाण्याने माळ्यावर नेत अल्पवयीन मुलीचा विनयभंग


या प्रकरणी पोलीस प्रशासनाकडून दखल घेतली जात नसल्याचे तसेच गुन्हा दाखल करू नये, म्हणून धमकावल्याचाही आरोप मुलीच्या कुटुंबीयांनी केला आहे. इतक्यावरच न थांबता खारघर मधील शिल्प चौक येथून पीडितेला पळवून नेण्याचा प्रयत्न केल्याचेही आरोप पीडित मुलीच्या वडिलांनी केले आहे. याप्रकरणी तळोजा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजू अडांगळे हे अधिक तपास करीत आहेत.

हेही वाचा - अल्पवयीन विद्यार्थीनीसोबत वर्गातच अश्लील चाळे; विकृत मुख्याध्यापकाला बेदम चोप

Last Updated : Dec 27, 2019, 7:35 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details