महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Mar 30, 2022, 7:40 PM IST

ETV Bharat / state

Suicide Case Shahapur : वडिलांसह मुलीच्या आत्महत्येप्रकरणी पोलीस अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल

वडिलांसह मुलीनी राहत्या घरातच गळफास घेऊन आत्महत्या केल्या प्रकरणी सुसाईट नोटमध्ये एका पोलीस अधिकाऱ्याचे नाव नमूद केल्याने ग्रामीण पोलीस दलात एकच खळबळ उडाली होती. आता या प्रकरणाचा तपास करून शहापूर पोलीस ठाण्यात केला असून पोलीस अधिकाऱ्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. आर. एस. क्षीरसागर असे गुन्हा दाखल झालेल्या पोलीस उपनिरीक्षकाचे नाव आहे.

आत्महत्याग्रस्त
आत्महत्याग्रस्त

ठाणे -वडिलांसह मुलीनी राहत्या घरातच गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना १५ मार्च रोजी घडली होती. ही घटना शहापूर तालुक्यातील आसनगाव घडली असून खळबळजनक बाब म्हणजे वडिलांनी आत्महत्या करण्यापूर्वी दोन पानी सुसाईट नोटमध्ये एका पोलीस अधिकाऱ्याचे नाव नमूद केल्याने ग्रामीण पोलीस दलात एकच खळबळ उडाली होती. आता या प्रकरणाचा तपास करून शहापूर पोलीस ठाण्यात केला असून पोलीस अधिकाऱ्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. आर. एस. क्षीरसागर असे गुन्हा दाखल झालेल्या पोलीस उपनिरीक्षकाचे नाव आहे. तर विकास केदारे (वय 36 ) आणि मुलगी आर्या केदारे ( वय 11) असे आत्महत्या करणाऱ्या बाप लेकीचे नावे आहेत.

पत्नीच्या आत्महत्याप्रकरणी कारागृहात :मृतक विकास केदारे हे कुटुंबासह शहापूर तालुक्यातील आसनगाव परिसरात राहत होते. त्यातच १५ ऑगस्ट २०२१ रोजी मृत विकासची पत्नी मोनाली हीने घरातच कीटकनाशक औषध प्राशनकरून आत्महत्या केली होती. त्यावेळी पोलिसांनी पत्नीच्या आत्महत्येला पती विकास कारणीभूत असल्याचा ठपका ठेवून विकास व त्याची वयोवृद्ध आई या दोघांना मोनालीच्या आत्महत्येच्या आरोपाखाली अटक केली होती. त्यानंतर तपास अधिकाऱ्याने दोघांना न्यायालयात हजर केले असता मृतक विकास व त्यांची वयोवृद्ध आईला कारागृहाची शिक्षा सुनावली होती. त्यातच जानेवारी महिन्यता विकास कारागृहातून बाहेर आला होता. त्यानंतर आत्महत्यापूर्वी सुसाईट नोटमध्ये आपण काही गुन्हा केला नसताना देखील माझ्यावर खोटा आरोप करून पोलीस अधिकाऱ्याने मला खूप त्रास दिला. त्यामुळे आत्महत्या करत असल्याचे सुसाईट नोटमध्ये नमूद करून १५ मार्च रोजी बाप – लेकीने घरातच गळफास लावून जीवन यात्रा संपवली.

सुसाईट नोट प्रकरणी पोलीस तपास सुरु :दरम्यान विकास व आर्या यांच्या आत्महत्येला पोलीस उपनिरीक्षक क्षीरसागर हेच जाबाबदार आहेत. त्यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी राष्ट्रवादीचे प्रवक्ते शिवाजी रगडे यानी पोलीस उपअधिक्षक नवनाथ ढवळे यांच्याकडे केली होती. या मागणीवरून या प्रकरणाचा तपास पडघा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिनेश कटके यांना दिला. त्यांनी विकास केदारे आत्महत्या प्रकरणाचा योग्य दिशेने तपास करुन मृतक विकास यांची बहिण शिल्पा संजय शिरसाट यांच्या तक्रारीवरुन बाप लेकीला आत्महत्येस प्रवृत केल्याचा गुन्हा पोलीस उपनिरीक्षक क्षीरसागर यांच्यावर शहापुर पोलीस ठाण्यात दाखल केला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details