ठाणे : ठाणे शहरात एका मुलीची तस्करी आणि तिला वेश्याव्यवसाय करण्यास भाग पाडल्याप्रकरणी चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (forced minor girl into prostitution in Thane). पोलिसांनी या प्रकरणी माहिती दिली आहे. मुंब्रा पोलिसांनी शुक्रवारी भारतीय दंड संहितेच्या प्रोटेक्शन ऑफ चिल्ड्रन फ्रॉम सेक्शुअल ऑफेन्स (POCSO) कायदा आणि अनैतिक वाहतूक (प्रतिबंध) कायद्या संबंधित कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. (Thane Crime News).
Thane Crime News : अल्पवयीन मुलीला देहविक्रीसाठी भाग पाडणाऱ्या चौघांवर गुन्हा दाखल - ठाणे शहरात एका मुलीची तस्करी
तरुणीने आरोप केला आहे की, मे 2020 ते जुलै 2020 या कालावधीत एका महिलेने तीन अन्य साथिदारांच्या मदतीने तिला एका दिवसाला 5,000 रुपयांसाठी वेश्याव्यवसाय करण्यास भाग पाडले. (forced minor girl into prostitution in Thane). याप्रकरणी अधिक तपास सुरू आहे. (Thane Crime News).
prostitution
तरुणी आर्थिक संकटाचा सामना करत होती : पीडितेचे म्हणणे आहे की, ती कोविड-19 महामारीच्या काळात एका संस्थेशी संबंधित महिलेच्या संपर्कात आली होती. यावेळी ती आर्थिक संकटाचा सामना करत होती. तिने आरोप केला आहे की, मे 2020 ते जुलै 2020 या कालावधीत त्या महिलेने तीन अन्य साथिदारांच्या मदतीने तिला एका दिवसाला 5,000 रुपयांसाठी वेश्याव्यवसाय करण्यास भाग पाडले. याप्रकरणी अधिक तपास सुरू आहे.