महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Case Of Extortion Against Journalists : चार पत्रकारांविरोधात खंडणीचा गुन्हा दाखल, कारखाना मालकाला लुटले - कारखानामालकाला लुटले

उल्हासनगरमधील कारखाना बंद करण्याची धमकी देत चार पत्रकारांनी चाळीस हजार रुपये खंडणी (Case Of Extortion Against Journalists) घेतली. याबद्दल त्यांच्या विरोधात उल्हासनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चारही आरोपी फरार असून, पुढील तपास सुरू (case registered in Ulhasnagar Police Station) आहे.

Case Of Extortion Against Journalists
पत्रकारांविरोधात खंडणीचा गुन्हा दाखल

By

Published : Dec 6, 2022, 8:13 AM IST

Updated : Dec 6, 2022, 9:09 AM IST

ठाणे : उल्हासनगरमधील एका प्लास्टिक कारखानदाराला तक्रार करण्याची धमकी देत, कारखाना बंद करण्याच्या नावाने कारखानदाराकडून चाळीस हजार रुपयेखंडणी घेणाऱ्या चार पत्रकाराविरोधात उल्हासनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्याने शहरात एकच खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे खंडणीखोर कारखान्याच्या सीसीटीव्हीत कैद झाले असून त्या आधारे पोलीस त्यांचा शोध आहे. शिवकुमार मिश्रा, राजेश शर्मा , रेखा दिघे, नितेश खेटवानी असे गुन्हा दाखल झालेल्या पत्रकारांचे नाव (case of extortion against journalists registered) आहे.

पत्रकारांविरोधात खंडणीचा गुन्हा दाखल

१ लाख रुपयांची मागणी :उल्हासनगरमधील सतिष चाळ कंपाऊंड परिसरात मामल पॉलीमर्स एल. एल. पी नावाने जोसेफ जॉन डिसूजा यांचा प्लास्टिकचा कारखाना आहे. या कारखान्याची प्रदूषण नियंत्रण मंडळ व पोलीस ठाण्यात तक्रार करण्याची धमकी मॅनेजर उदय खिल्लीरी यांना खंडणीखोर पत्रकारांनी दिली. त्यानंतर १४ नोव्हेंबर आणि २१ नोव्हेंबर रोजी या आरोपींनी कारखाना बंद करण्याची धमकी देत, १ लाख रुपयांची मागणी केली होती. मात्र तडजोड करून ३० हजार रोख आणि १० हजार गुगल पे ऑनलाईन असे एकूण ४० हजारांची खंडणी घेतल्याची तक्रार कारखान्याचे मालक डिसूजा यांनी उल्हासनगर पोलीस ठाण्यात (case registered in Ulhasnagar Police Station) दिली.


अनोखळी खंडणीखोर :कारखान्याचे मालक डिसूजा यांच्या तक्रारीवरून चार पत्रकारांसह इतर अनोखळी खंडणीखोर विरोधात भादंवि कलम ३८५, ३८४, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल केला. तर गुन्हा दाखल झाल्याची कुणकुण लागताच चारही आरोपी फरार असून हे आरोपी विविध साप्ताहिक आणि युट्युब चॅनेलचे पत्रकार असल्याचे सांगण्यात आले. या गुन्ह्याचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक सचिन शिंदे करीत (Case Of Extortion Against Journalists) आहेत.

Last Updated : Dec 6, 2022, 9:09 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details