महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांच्या विरोधात पोलीसात तक्रार दाखल, हिंदू धर्माच्या भावना दुखावल्याचा आरोप - thane

ठाण्यातील उल्हासनगर येथील एका महिला वकिलाने उर्मिला विरोधात तक्रार दाखल केली आहे. याप्रकरणी विठ्ठलवाडी पोलिसांनी या तक्रारीवरुन उर्मिला मातोंडकर विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

...यामुळे उर्मिला मातोंडकर विरोधात उल्हासनगर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल

By

Published : Apr 14, 2019, 7:10 PM IST

Updated : Apr 14, 2019, 7:50 PM IST

ठाणे - बॉलिवूड अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांनी अलिकडेच राजकारणात एन्ट्री घेतली आहे. एका वृत्तवाहिनीवर मुलाखत देताना हिंदू धर्माबद्दल अशोभनीय वक्तव्य केल्यामुळे ठाण्यातील उल्हासनगर येथील एका महिला वकिलाने उर्मिला यांच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे. याप्रकरणी विठ्ठलवाडी पोलिसांनी या तक्रारीवरून उर्मिला मातोंडकरांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
उर्मिला मातोंडकर काँग्रेसकडून लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या आहेत. अलिकडेच त्यांनी एका वृत्तवाहिनीवर मुलाखत देताना हिंदू धर्माबद्दल अशोभनीय वक्तव्य केल्याचे समोर आले होते. याविरोधात महिला वकील राखी बरोड यांनी विठ्ठल वाडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रमेश भामे यांच्याकडे तक्रार दाखल केली होती. सोबतच काही पुरावेदेखील सादर केले होते. अखेर या पुराव्यांच्या आधारावर उर्मिलाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणाचा पुढील तपास विठ्ठलवाडी पोलीस करत आहेत.

Last Updated : Apr 14, 2019, 7:50 PM IST

For All Latest Updates

ABOUT THE AUTHOR

...view details