ठाणे - ऑनलाईन मतदार नोंदणीसाठी अर्जासोबत बोगस कागदपत्र जोडल्याचा आढळून आले आहे. ( Bogus Documents Submitted for Online Voter Registration ) याप्रकरणी ठाणे जिल्ह्यातील 137-भिवंडी पूर्व आणि 151-बेलापूर विधानसभा मतदारसंघातील प्रभारी निवडणूक नायब तहसिलदार यांनी संबंधितांविरुध्द गुन्हे दाखल केले आहेत.
भिवंडी पूर्व विधानसभा मतदारसंघामध्ये 6 जणांविरुध्द तर बेलापूर विधानसभा मतदारसंघात 22 जणांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उपजिल्हा निवडणूक अधिकारी अर्चना कदम यांनी ही माहिती दिली. ( Government Officer Archana Kadam Thane )
मतदार यादीचा संक्षिप्त पुर्नरिक्षण कार्यक्रमांतर्गत प्रकार आला उघडकीस -
1 जानेवारी 2022 या अर्हता दिनांकावर आधारीत छायाचित्रासह मतदार यादीचा संक्षिप्त पुर्नरिक्षण कार्यक्रमांतर्गत प्राप्त झालेल्या ऑनलाईन अर्जांसोबत बनावट कागदपत्रे जोडल्याचे निर्दशनास आले. यानंतर 137-भिवंडी पूर्व मतदारसंघाचे प्रभारी नायब तहसिलदार विठ्ठल गोसावी यांनी भिवंडीच्या शांतीनगर पोलीस ठाण्यात 6 जणांविरुध्द गुन्हा दाखल केला. अशाचप्रकारे सीबीडी बेलापूर येथील पोलीस ठाण्यात 22 जणांविरुध्द 151-बेलापूर मतदारसंघाचे प्रभारी नायब तहसिलदार राजश्री पेडणेकर यांच्या तक्रारीवरुन गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हेही वाचा -ठाणे : नवजात बालिकेचा सौदा करणाऱ्या आई - वडिलांसह 6 जणांना अटक