महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

भरलेल्या २७ गॅस सिलेंडरवर डिलिव्हरी बॉयच्या दुकलीने मारला डल्ला; दोघावर गुन्हा दाखल .. - डोंबिवली गॅस सिलेंडर चोरी बातमी

हनुमानने ७ मे ते ९ मे २०२२ दरम्यान गॅस एजन्सीमधील गोदामातून भरलेले गॅस सिलेंडर ग्राहकांना डिलिव्हरीसाठी घेऊन गेला होता. त्यानंतर गॅस सिलेंडरचा टेम्पो गोदामबाहेर सोडून पसार झाला. त्यामुळे गॅस एजन्सीच्या व्यवस्थापकाने त्याला मोबाईलवर संपर्क साधला असता मोबाईल बंद असल्याने संशय बळावला आणि टेम्पोमधील गॅस सिलेंडरची मोजणी केल्यावर त्यामध्ये ९ भरलेली गॅस सिलेंडर आढळून आली नाही. तर आरोपी श्रवणकुमार त्याच सुमारास टेम्पोमध्ये भरलेली गॅस सिलेंडर घेऊन पसार झाला. या दोघांनी आपसात संगनमत करून एकूण २७ भरलेली गॅस सिलेंडरवर डल्ला मारला.

case filed against two for stealing gas cylinders in dombavali
भरलेल्या २७ गॅस सिलेंडरवर डिलिव्हरी बॉयच्या दुकलीने मारला डल्ला

By

Published : May 11, 2022, 8:39 PM IST

ठाणे - गॅस एजन्सीमध्ये गॅस डिलिव्हरीचे काम करणाऱ्या दोघा डिलिव्हरी बॉयने २७ भरलेल्या गॅस सिलेंडरवर डल्ला मारल्याचे उघडकीस आले आहे. याप्रकरणी मानपाडा पोलीस ठाण्यात दोघा डिलिव्हरी बॉयवर गुन्हा दाखल करून पोलिसांनी त्यांचा शोध सुरू केला आहे. हनुमान बिष्णोई , श्रवणकुमार बिष्णोई (रा. सागर्ली डोंबिवली) असे गुन्हा दाखल झालेल्या डिलिव्हरी बॉयचे नावे आहेत.

संगनमताने डल्ला - गॅस सिलेंडरची दिवसेंदिवस दरवाढ होत असून एक गॅस सिलेंडर घेण्यासाठी ग्राहकांना एक हजारांच्यावर रुपये सिलेंडरसाठी मोजावे लागत आहे. त्यातच डोंबिवली पूर्वेतील पेंढारकर कॉलेज शेजारी जयशक्ती आणि शिवशक्ती भारत गॅस एजन्सी या दोन गॅस एजन्सी शेजारीच आहे. पैकी जयशक्ती गॅस एजन्सीमध्ये आरोपी हनुमान हा डिलिव्हरी बॉयचे काम करतो तर आरोपी श्रवणकुमार हा शिवशक्ती भारत गॅस एजन्सीमध्ये डिलिव्हरी बॉयचे काम करून दोघेही डोंबिवलीतील सागर्ली भागातील एका इमारतीमध्ये राहतात. आरोपी हनुमानने ७ मे ते ९ मे २०२२ दरम्यान गॅस एजन्सीमधील गोदामातून भरलेले गॅस सिलेंडर ग्राहकांना डिलिव्हरीसाठी घेऊन गेला होता. त्यानंतर गॅस सिलेंडरचा टेम्पो गोदामबाहेर सोडून पसार झाला. त्यामुळे गॅस एजन्सीच्या व्यवस्थापकाने त्याला मोबाईलवर संपर्क साधला असता मोबाईल बंद असल्याने संशय बळावला आणि टेम्पोमधील गॅस सिलेंडरची मोजणी केल्यावर त्यामध्ये ९ भरलेली गॅस सिलेंडर आढळून आली नाही. तर आरोपी श्रवणकुमार त्याच सुमारास टेम्पोमध्ये भरलेली गॅस सिलेंडर घेऊन पसार झाला. या दोघांनी आपसात संगनमत करून एकूण २७ भरलेली गॅस सिलेंडरवर डल्ला मारून पळून गेलेत. आता आरोपींनी भरलेल्या गॅस सिलेंडरची कुठे व कोणाला विक्री केली. याचा तपास मानपाडा पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक गांगुर्डे करत आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details