ठाणे -कंपनीत पत्रे बसविण्याचे काम करत असताना तोल जाऊन कामगाराचा गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात मृत्यू झाला होता. याप्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी तब्ब्ल ११ महिन्यांनंतर ठेकेदारासह सुपरवायझर विरोधात गुन्हा दाखल केला आहे. संजयकुमार मुन्नी, असे मृत्यू झालेल्या कामगाराचे नाव आहे. तर त्याच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या ठेकेदार शौकीन आणि सुपरवायझर अजयकुमार असे गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.
हे ही वाचा - भरधाव वाहनाने मायलेकीला चिरडले; 6 वर्षीय चिमुकली ठार
मिळालेल्या माहितीनुसार, अंबरनाथ पुर्व येथील आनंदनगर एमआयडीसी परिसरात ईचार इक्वीमेंट प्रा.लि. ही कंपनी आहे. त्या कंपनीत गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात मृत संजयकुमार मुन्नी याला ठेकेदार शौकीन आणि सुपरवायझर अजयकुमार यांनी पत्रे बसविण्याचे काम सांगितले होते. संजयकुमार हा स्टिल कॉलम क्रमांक १२ व १३ मधील लोखंडी रॉफ्टरवर उभे राहून तो मॉनीटरचे पत्रे बसवत होता. त्यावेळी अचानक त्याचा तोल जावून तो खाली जमिनीवर पडून त्याचा मृत्यू झाला.