महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

भिवंडीत अनधिकृत बांधकाम करणाऱ्या विकासकांवर गुन्हा दाखल

३ फेब्रुवारी २०२० ते ९ ऑक्टोबर २०२० या काळात अनधिकृत बांधकाम केल्याप्रकरणी दोन विकासकांवर एमआरटीपी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रियाज बर्डी आणि मुजीब बर्डी अशी गुन्हा दाखल झालेल्या विकासकांची नावे आहेत.

case filed against a developer for  doing liiligal construction
case filed against a developer for doing liiligal construction

By

Published : Oct 8, 2020, 9:35 PM IST

ठाणे - शहरातील वंजारपट्टी नाका परिसरात अनधिकृत बांधकाम करणाऱ्या विकासकांवर शांतीनगर पोलीस ठाण्यात बुधवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ३ फेब्रुवारी २०२० ते ९ ऑक्टोबर २०२० या काळात अनधिकृत बांधकाम केल्याप्रकरणी दोघांवरही एमआरटीपी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रियाज बर्डी, मुजीब बर्डी अशी त्यांची नावे आहेत.

भिवंडीतील धामणकर नाका पटेल कंपाउंड येथील जिलानी इमारत दुर्घटनेनंतर सध्या शहरातील अनधिकृत बांधकामांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. या पार्श्वभूमीवर शहरात अनधिकृत बांधकाम करणाऱ्या बिल्डरांकडून खंडणी उकळणाऱ्या व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल करण्याची मोहीम भिवंडी पोलिसांकडुन हाती घेण्यात आली असून खंडणी प्रकरणी सुमारे पाच ते सहा गुन्हा दाखल झाले आहेत .

या मोहिमेअंतर्गत आज रियाज बर्डी आणि मुजीब बर्डी या दोन विकासकांवर कारवाई करण्यात आली. या दोघांवरही अनधिकृत बांधकाम केल्याप्रकरणी दोघांवरही एमआरटीपी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details