महाराष्ट्र

maharashtra

By

Published : May 24, 2022, 9:32 AM IST

Updated : May 24, 2022, 3:07 PM IST

ETV Bharat / state

बेहिशोबी मालमत्ता : भाजपचे माजी आमदार नरेंद्र मेहता अन् त्यांच्या पत्नीवर गुन्हा दाखल

भाजपचे माजी आमदार नरेंद्र मेहता ( Former BJP MLA Narendra Mehta ) व त्यांची पत्नी सुमन मेहता यांनी आपल्या पदाचा दुरूपयोग करत अपसंपदा जमविल्या प्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक कायद्याच्या अंतर्गत 10 मे, 2016 साली लोकायुक्त यांच्या आदेशान्वये चौकशी लावण्यात आलेली होती. त्यात तब्बल सहा वर्षानंतर 19 मे रोजी नवघर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल झाल्यापासून मेहता पती-पत्नी गायब असल्याचे समोर आले आहे.

छायाचित्र
छायाचित्र

मीरा भाईंदर ( ठाणे )- भाजपचे माजी आमदार नरेंद्र मेहता ( Former BJP MLA Narendra Mehta ) व त्यांची पत्नी सुमन मेहता यांनी आपल्या पदाचा दुरूपयोग करत अपसंपदा जमविल्या प्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक कायद्याच्या अंतर्गत 10 मे, 2016 साली लोकायुक्त यांच्या आदेशान्वये चौकशी लावण्यात आलेली होती. त्यात तब्बल सहा वर्षानंतर 19 मे रोजी नवघर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल झाल्यापासून मेहता पती-पत्नी गायब असल्याचे समोर आले आहे.

सुमन मेहता

2002 नरेंद्र लालचंद मेहता हे ऑगस्ट 2002 सालापासून 2017 पर्यंत मीरा भाईंदर महापालिकेत नगरसेवक होते. महापौर, विरोधी पक्षनेते पद, प्रभाग समिती अशी पदे उपभोगली. 2014 ते 2019 पर्यंत मीरा भाईंदर मतदार संघाचे भाजप पक्षाचे आमदार होते. त्यांनी बेहिशेबी मालमत्ता जमवल्याच्या तक्रारीवरुन लोकायुक्तांच्या आदेशाने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे केली होती. ती खुली चौकशी सध्या पालघर जिल्हा एसीबी तपास करत होती. मेहता व त्यांच्या कंपन्यात मोठ्या प्रमाणात घोटाळा झाला असून कंपन्यांनी शासन महसूल बुडवले तसेच उत्पन्नापेक्षा अधिक संपत्ती व बेनामी संपत्ती जमवल्याची तक्रार करण्यात आली होती. त्यानंतर लोकायुक्तांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागामार्फत चौकशी लावली होती.

गुन्हा दाखल झाल्यापासून दाम्पत्य गायब - तब्बल सहा वर्षे चौकशी केल्यानंतर 19 मे रोजी अपर पोलीस अधीक्षक अनिल घेरडीकर यांच्या तक्रारीवरुन नवघर पोलीस ठाण्यात लोकसेवक नरेंद्र लालचंद मेहता व त्यांची पत्नी सुमन नरेंद्र मेहता यांच्या विरोधात भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम सन 1988 चे कलम 13 (1) (इ), 13 (2)सह भा.दं.वि.चे कलम 109 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यानुसार नरेंद्र मेहता यांनी 1 जानेवारी, 2006 ते 31 ऑगस्ट, 2015 या कालावधीत लोकसेवक या नात्याने आपल्या पदाचा दुरुपयोग करुन उत्पन्नापेक्षा 9 कोटी 25 लाख 51 हजार 773 रुपये जास्त असंपदा संपादीत केली आहे. तर त्यांची पत्नी सुमन मेहता यांनी गैरमार्गाने संपादित केलेली मालमत्ता विनियोग करण्यामध्ये सहाय्य केल्याचा आरोप आहे.

30 मे रोजी होणार जामीन अर्जावर सुनावणी -गुन्हा दाखल झाल्यापासून मेहता दाम्पत्य गायब असून ठाणे जिल्हा सत्र न्यायालयात अटकपूर्व जामीनसाठी अर्ज दाखल केला होता. न्यायालयात झालेला युक्तिवादानंतर 30 मे रोजी सुनावणी होणार आहे. त्यामुळे मेहता यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.

हेही वाचा -Teacher arrested : प्रेमाची फूस लावून अल्पवयीन विद्यार्थीनीला पळविणारा शिक्षक गजाआड

Last Updated : May 24, 2022, 3:07 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details