महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

व्हाट्सऍपवर मैत्री करून कथित पत्रकाराचा महिलेवर बलत्कार; गुन्हा दाखल

एका कथित पत्रकारने त्याच्याच व्हाट्सऍप ग्रुपवर असेलेल्या 37 वर्षीय महिलेशी मैत्री करत लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर बलात्कार केल्याची घटना घडली आहे. शिवाय पीडितेची आर्थिक फसवणूकही केली. हा प्रकार उल्हासनगरमध्ये उघडकीस आला आहे. खळबळजनक बाब म्हणजे पीडिता कथित पत्रकाराच्या अत्याचारामुळे गर्भवती असल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी मध्यवर्ती पोलीस ठाण्यात कथित पत्रकारावर बलत्कारसह फसवणुकीचा गुन्हा दाखल करून पोलिसांनी तपास सुरू केला आहे. शिवकुमार मिश्रा, असे गुन्हा दाखल झालेल्या कथित पत्रकाराचे नाव आहे.

छायाचित्र
छायाचित्र

By

Published : May 2, 2022, 7:02 AM IST

ठाणे - एका कथित पत्रकारने त्याच्याच व्हाट्सऍप ग्रुपवर असेलेल्या 37 वर्षीय महिलेशी मैत्री करत लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर बलात्कार केल्याची घटना घडली आहे. शिवाय पीडितेची आर्थिक फसवणूकही केली. हा प्रकार उल्हासनगरमध्ये उघडकीस आला आहे. खळबळजनक बाब म्हणजे पीडिता कथित पत्रकाराच्या अत्याचारामुळे गर्भवती असल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी मध्यवर्ती पोलीस ठाण्यात कथित पत्रकारावर बलत्कारसह फसवणुकीचा गुन्हा दाखल करून पोलिसांनी तपास सुरू केला आहे. शिवकुमार मिश्रा, असे गुन्हा दाखल झालेल्या कथित पत्रकाराचे नाव आहे.

देव दर्शनाच्या बहाण्याने पीडितेवर अत्याचार -पीडित महिला उल्हासनगरमधील एका खासगी फायनान्स कंपनीत कार्यरत आहे. 2016 सालपासून आरोपीच्या व्हाट्सऍप ग्रुपवर असल्याने दोघांची ओळख झाली. त्यातच 2018 साली एका सामाजिक कामाच्या निमित्ताने भेट झाली. या भेटीनंतर आणखीच ओळख वाढल्याने दोघांत मैत्री झाल्याने सतत मोबाईलवर बोलणे सुरू होते. त्यानंतर ओळखीचे रुपांतर प्रेमात झाले. त्यानंतर ऑगस्ट, 2018 ला देव दर्शनाच्या बहाण्याने पीडितेला कार मध्ये नेऊन टिटवाळा परिसरात तिच्या इच्छे विरुद्ध बळजबरीने अत्याचार केला.

आरोपीवर खंडणीचा गुन्हा दाखल -काही महिन्यानंतर दोघामध्ये वाद होऊन भांडण झाल्याने पीडितेने आरोपीचा मोबाईल नंबर ब्लॉक केला. मात्र, त्यानंतर आरोपीने पीडितेची माफी मागून पुन्हा, असे भांडण होणार नाही आपण लवकरच लग्न करू असे पुन्हा आमिष दाखवले. त्यामुळे पीडितेने त्याकडे लग्नाचा तगादा लावल्याने त्याने पीडितेला जून, 2019 मध्ये उल्हासनगरमध्येच एक खोली भाड्याने राहण्यास देऊन तोही तिच्यासोबत राहत होता. दरम्यानच्या काळात दोघेही सोबत राहत असतानाच सप्टेंबर, 2019 साली पीडितेच्या नावाने खासगी फायनान्समधून कर्ज काढून 1 लाख 60 हजार आरोपीने घेतले. त्यातच 2020 साली आरोपीवर एका प्रकरणात खंडणीचा गुन्हा दाखल झाल्याने तो फरार झाला होता. त्याचवेळी आरोपीला पत्नी व दोन मुले असल्याचे पीडितेला समजले होते. तर पीडितेला पैशाची गरज असल्याने तिने त्याला पैसे मागितले असता आता माझ्या असलेल्या खंडणी प्रकरणात सर्व पैसे खर्च झाले असून लवकरच आपण लग्न करू, मात्र आदी माझ्या पहिल्या पत्नीला घटस्फोट देतो, असे बोलून तिची समजूत काढली.

पोटातील बाळ माझे नाही, असे बोलून घरातून दिले हाकलून -दरम्यानच्या काळात म्हणजे सप्टेंबर, 2020 साली पुन्हा दुसरीकडे पीडितेला खोली भाड्याने घेऊन दिली. तर ऑक्टोबर, 2020 रोजी पीडिता गर्भवती राहिल्याने आरोपीने स्वतःचे खरेदी केलेल्या घरात पीडितेला ठेवून दोघेही सोबत राहत होते. या दरम्यान 20 फेब्रुवारी, 2020 ला आरोपी दारू पिऊन घरी आला आणि भांडण करत पिडीतेला अश्लील शिवीगाळ करत तुझ्या पोटातील बाळ माझे नाही, असे बोलून तिला घरातून हाकलून दिले. अशाच परिस्थितीत पीडिता तिच्या बहिणीच्या घरी राहण्यास गेली.

व्हाट्सऍप स्टेटेस पीडितेची बदनामी -त्यानंतर 27 एप्रिल, 2022 रोजी आरोपीचे व्हाट्सऍप स्टेटेस पीडितेने व तिच्या बहिणीने पहिले असता त्यावर पीडितेच्या नावाने अश्लील भाषेतील मजकूर टाईप करून तिचे अश्लील फोटो अपलोड करून तिची बदनामी केल्याचे आढळून आले. या घटनेनंतर पीडितेने 30 एप्रिल, 2022 रोजी मध्यवर्ती पोलीस ठाण्यात धाव घेत तिच्यावर मे, 2018 ते 27 एप्रिल, 2022 पर्यंत घडलेल्या प्रसंगाचे कथन करताच पोलिसांनी कथित पत्रकार शिवकुमार मिश्रा विरोधात भा.दं.वी.चे कलम 376, 420, 406, 500, 323 व 67 प्रमाणे गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.

हेही वाचा -Dipali Sayyed Criticized Amruta Fadnavis : 'फडणवीसांनी दावणीला बांधलेली म्हैस शिवसेनेच्या वाटेवर सोडू नये अन्यथा...'

ABOUT THE AUTHOR

...view details