नवी मुंबई -कोरोनावर लस येईपर्यंत आपल्याला काळजी घ्यावीचं लागेल, असे वक्तव्य गृह राज्यमंत्री सतेज पाटील यांनी केले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सतेज पाटील यांच्या माध्यमातून नवी मुंबई महानगरपालिकेत आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये होणारा कोरोनाचा प्रसार व मृत्युदर कमी करण्याचे आदेश सतेज पाटील यांनी दिले. तसेच कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांचीही त्यांनी भेट घेतली. यावेळी त्यांनी नवी मुंबई शहरातील कोरोना परिस्थिती व अन्य समस्यांबाबत आयुक्तांशी चर्चा केली.
कोरोनावर लस येईपर्यंत आपल्याला काळजी घ्यावीच लागेल - गृहराज्यमंत्री सतेज पाटील
कोरोनावर लस येईपर्यंत आपल्याला काळजी घ्यावीचं लागेल, असे वक्तव्य गृह राज्यमंत्री सतेज पाटील यांनी केले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सतेज पाटील यांच्या माध्यमातून नवी मुंबई महानगरपालिकेत आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये होणारा कोरोनाचा प्रसार व मृत्यूदर कमी करण्याचे आदेश सतेज पाटील यांनी दिले.
दिवसेंदिवस एपीएमसीमध्ये कोरोनाचा प्रसार वाढत आहे. तसेच शहरातील कोरोनामुळे होत असलेला मृत्युदरही वाढत आहे. तो कमी करण्याकडे लक्ष देण्याचे आदेश सतेज पाटील यांनी दिले. दररोज येणाऱ्या नागरिकांच्या संख्येमुळे एपीएमसी हा कायम हॉटस्पॉट राहणार असल्याचेही पाटील यांनी म्हटले. याशिवाय कोरोनावर लस येईपर्यंत आपल्याला काळजी घ्यावीचं लागेल. त्याचबरोबर डॉक्टरांनी देखील थोडा धोका पत्करून गोरगरीब रुग्णांची मदत करावी, अशी शासनाची अपेक्षा असल्याचे सतेज पाटील म्हणाले.