महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

आरोपीला पकडण्यासाठी गेलेल्या पोलिसांच्या अंगावर घातली कार; पोलीस गंभीर

दुपारी एक वाजण्याच्या सुमारास एका कारमधून संशयित आरोपी संतोषीमाता रोडवरील एचडीएफसी बँकेजवळ आले. त्यावेळी पोलीस कर्मचारी अमोल गोरे ती कार थांबवण्यासाठी त्यांच्यासमोर येऊन उभे राहिले. मात्र, आरोपींनी कार थांबविण्याऐवजी भरधाव वेगाने थेट गोरे यांच्या अंगावर घालून घटनास्थळावरून पळ काढला. ही कार अक्षरशः गोरे यांच्या अंगावरून नेण्यात आल्याने ते यात जबर जखमी झाले.

आरोपीला पकडण्यासाठी गेलेल्या पोलिसांच्या अंगावर चढवली कार; पोलीस गंभीर

By

Published : Aug 31, 2019, 10:02 PM IST

ठाणे - आरोपीला पकडण्यासाठी गेलेल्या पोलिसांच्या अंगावर आरोपींनी थेट भरधाव कार घातल्याची धक्कादायक घटना कल्याणमध्ये घडली. आरोपीने दिलेल्या कारच्या धडकेत पोलीस कर्मचारी गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अमोल गोरे असे जखमी पोलीस कर्मचाऱ्याचे नाव असून ते डीसीपी स्कॉटच्या पथकात कार्यरत आहेत.

हे ही वाचा -क्राईम पेट्रोल मालिका बघून रचला ३४ लाख रुपयांच्या चोरीचा बनाव

कल्याण पश्चिमेकडील संतोषीमाता परिसरात बँकेवर दरोडा टाकण्यासाठी काही दरोडेखोर येणार असल्याची माहिती कल्याण पोलिसांच्या डीसीपी स्कॉटला मिळाली होती. त्यानुसार या पथकाने त्या ठिकाणी सापळा रचला होता. दुपारी एक वाजण्याच्या सुमारास महिंद्रा कारमधून संशयित आरोपी संतोषीमाता रोडवरील एचडीएफसी बँकेजवळ आले. त्यावेळी पोलीस कर्मचारी अमोल गोरे ती कार थांबवण्यासाठी त्यांच्यासमोर येऊन उभे राहिले . मात्र, आरोपींनी कार थांबविण्याऐवजी भरधाव वेगाने थेट गोरे यांच्या अंगावर घालून घटनास्थळावरून पळ काढला. ही कार अक्षरशः गोरे यांच्या अंगावरून नेण्यात आल्याने ते यात जबर जखमी झाले.

हे ही वाचा -ठाण्यात जुगाराच्या अड्ड्यावर छापा; १ लाख २५ हजारांचा मुद्देमाल जप्त, ८३ जुगाऱ्यांना अटक

दरम्यान, हा प्रकार घडल्यानंतर डीसीपी स्कॉटमधील इतर सहकाऱ्यांनी त्यांना एका खासगी रुग्णालयात दाखल केले. या घटनेत गोरे यांना मोठ्या प्रमाणात दुखापत झाली असून पोलीस संबंधित आरोपींचा कसून शोध घेत आहेत. याप्रकरणी महात्मा फुले पोलीस ठाण्यात गुन्हाही दाखल करण्यात आला आहे.

हे ही वाचा -कल्याणमध्ये 'जय श्रीराम' बोलण्यास टाळणाऱ्या तरुणाला बेदम मारहाण

ABOUT THE AUTHOR

...view details