महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

ठाण्यात धावत्या कारने घेतला पेट - thane police

'तीन हात नाका' येथून जाणाऱ्या धावत्या चारचाकी वाहनाने अचानक पेट घेतला असून यात कुठल्याही प्रकारची जीवितहानी झालेली नाही.

car-burned-in-thane
ठाण्यात धावत्या कारने घेतला पेट

By

Published : Jan 22, 2020, 10:36 AM IST

ठाणे - ठाण्यातील 'तीन हात नाका' येथील पुलावर एका चारचाकी वाहनाला अचानक आग लागली होती. मंगळवारी रात्री ऐन गर्दीच्या वेळी साजिद शेख यांच्या मालकीची कार (महिंद्रा झायलो) पेटली. त्यानंतर महानगर पालिका तसेच अग्नीशमन दलाचे जवान घटनास्थळी पोहोचले व त्यांनी आग विझवली. ही घटना मंगळवारी रात्री 9 वाजता घडली.

ठाण्यात धावत्या कारने घेतला पेट

हेही वाचा - 'आव्हान म्हणून स्वीकारल्यास डॉ.आंबेडकरांचे स्मारक दोन वर्षात होणार पूर्ण'

'तीन हात नाका' येथून जाणाऱ्या धावत्या चारचाकी वाहनाने अचानक पेट घेतला. गाडीला आग लागली आहे. हे लक्षात येताच गाडीतील सर्व प्रवासी तत्काळ गाडी खाली उतरले, व त्यांच्या संपूर्ण गाडीने पेट घेतला. चांगली बाब म्हणजे घटनेत कोणी जखमी झाले नसून, या आगीमुळे नितीन कंपनी रोड काही काळ वाहतूक पोलीसांनी बंद केला आहे. आग विझताच गाडी टोईंगकरुन रस्त्यावरुन दूर नेली व वाहतूक पोलिसांनी तत्काळ वाहतूक सुरू केली. दरम्यान, या आगीमुळे काही काळ या हायवेवर मोठी वाहतूक कोंडी झाली होती, अशी माहिती वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी दिली.

हेही वाचा - दीपक केसरकरांच्या अभिनंदन ठरावावरून वैभव नाईक अन् नितेश राणेंमध्ये वाद

ABOUT THE AUTHOR

...view details