महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

अति घाई, संकटात नेई; घोडबंदर रस्त्यावर भरधाव कार घुसली गटारात - अपघात

सुदैवाने यात कुठलीही जीवितहानी झाली नसून चालकाला किरकोळ मार लागल्याने त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

अति घाई संकटात नेई; घोडबंदरवर भरधाव कार घुसली गटारात

By

Published : Jun 14, 2019, 1:02 PM IST

ठाणे- 'अति घाई, संकटात नेई' याची प्रचिती घोडबंदर रोडवर गुरुवारी झालेल्या एक्सयुव्ही कारच्या अपघाताने आली आहे. ही कार भरधाव वेगाने गायमुखाकडे जात असताना चालकाचे कारवरील नियंत्रण सुटल्याने ही कार रस्त्याच्या कडेला असलेल्या लाईट खांबाला धडकून गटारात घुसली. सुदैवाने यात कुठलीही जीवितहानी झाली नसून चालकाला किरकोळ मार लागल्याने त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

अति घाई संकटात नेई; घोडबंदरवर भरधाव कार घुसली गटारात

अपघातानंतर ही कार वाहतून पोलिसांनी क्रेनच्या साहाय्याने गटारातून बाहेर काढली.

ABOUT THE AUTHOR

...view details