ठाणे- नाशिकवरून मुंबईला जाणाऱया पंचवटी एक्स्प्रेसचे तीन डबे कल्याणजवळील पत्रीपूल दरम्यान वेगळे झाले होते व बाकीचे डबे सीएसटीच्या दिशेने रवाना झाले होते. कपलिंग तुटल्याने हा प्रकार घडला होता. अखेर नवीन इंजिन लावून रेल्वे मुंबईकडे रवाना झाली आहे. घटनेमुळे मध्य रेल्वेची वाहतूकीवर परिणाम झाला आहे.
नविन इंजिन लावून पंचवटी एक्स्प्रेस मुंबईकडे रवाना, कपलिंग तुटल्याने रखडली होती रेल्वे - panchawati express
मनमाड-मुंबई पंचवटी एक्स्प्रेसचे कपलिंग तुटल्यामुळे गाडीचे काही डब्बे मागे ठेवून धावल्याची घटना समोर आली आहे.

नविन इंजिन लावून पंचवटी एक्स्प्रेस मुंबईकडे रवाना
नविन इंजिन लावून पंचवटी एक्स्प्रेस मुंबईकडे रवाना
मनमाड-मुंबई पंचवटी एक्स्प्रेसचे कपलिंग तुटल्यामुळे गाडीचे काही डब्बे मागे ठेवून धावल्याची घटना समोर आली आहे. कल्याणच्या पत्रीपूल परिसराजवळ ही घटना घडली आहे. या गाडीचे इंजिनपासूनचे दोन डबे पुढे धावले आणि अन्य डबे मागेच राहिले. त्यानंतर नवीन इंजिन जोडून एक्स्प्रेस मुंबईकडे रवाना झाली आहे.
दरम्यान, मध्य रेल्वेवर जलद मार्गावरील वाहतुकीवर याचा परिणाम झाला आहे. कपलिंग तुटण्याची ही दुसरी घटना असून या पुर्वीही दिवा रेल्वे स्थानकादरम्यान असाच प्रकार घडला होता.
Last Updated : Mar 7, 2019, 1:59 PM IST