ठाणे - गेल्या महिन्याभरापासून सुरू असलेल्या राज्याच्या सत्ता स्थापनेच्या पेचाचे पडसाद भिवंडी उमटले. समाजवादीचे आमदार अबू आझमी आणि भिवंडीतील आमदार रईस शेख यांनी महाविकासआघाडीत असलेल्या शिवसेनेशी हातमिळणी केली. याच्या निषेधार्थ भिवंडीतील कार्यकत्यांनी अबू आझमी व रईस शेख यांचे प्रतिकात्मक पुतळे जाळले. त्यासोबत जोरदार घोषणाबाजीही केली. या घटनेमुळे भिवंडीतील राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
राज्याच्या सत्ता पेचाचे पडसाद भिवंडीत; समाजवादीच्या दोन आमदारांचे जाळले पुतळे - maharastra political crisis
राज्यात सरकार स्थापन करण्यासाठी शिवसेनेला समाजवादी पक्षाने समर्थन दिले आहे. त्यामुळे भिवंडी शहरातील नवी बस्ती परिसरात समाजवादी पक्षाचे आमदार रईस शेख व अबू असीम आझमी यांच्या प्रतिकात्मक पुतळ्यांना चपलाचे हार घालून जाळण्यात आले.
हेही वाचा-'महाराष्ट्रात लोकशाहीची हत्या झाली', राहुल गांधींचा भाजपवर हल्लाबोल
राज्यात सरकार स्थापन करण्यासाठी शिवसेनेला समाजवादी पक्षाने समर्थन दिले आहे. त्यामुळे भिवंडी शहरातील नवी बस्ती परिसरात समाजवादी पक्षाचे आमदार रईस शेख व अबू असीम आझमी यांच्या प्रतिकात्मक पुतळ्यांना चपलाचे हार घालून जाळण्यात आले. तसेच समाजवादी पार्टी मुर्दाबादचे नारे लगावले. आंदोलनकर्त्यांच्या म्हणण्यानुसार मतदान मागताना समाजवादीच्या आमदाराने भाजप शिवसेनेला सत्तेपासून रोखण्यासाठी मुस्लीम मतदारांची मते घेतली. मात्र, आता समाजवादी पक्षाचे दोन्ही आमदार सेनेसोबत गेल्याने या आमदारांनी मतदारांची फसवणूक केली, असा आरोप करीत स्थानिकांनी भिवंडी शहरातील नवी बस्ती परिसरात समाजवादी पक्षाचे दोन्ही आमदारांचे प्रतिकात्मक पुतळे जाळले.