महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

कल्याणच्या राया गावातील पुलाखाली आढळला महिलेचा अर्धवट जळालेला मृतदेह - मृतदेह  पंचवीस वर्षीय महिलेचा

कल्याण तालुक्यातील राया गावाच्या परिसरातील एका ब्रिज खाली अर्धवट जळालेल्या स्थितीत महिलेचा मृतदेह आढळून आला आहे. हा मृतदेह  पंचवीस वर्षीय महिलेचा असून चेहरा जळाल्याने तीची ओळख पटू शकली नाही.

जळालेल्या स्थितीत महिलेचा मृतदेह

By

Published : Jun 23, 2019, 9:14 PM IST

ठाणे- कल्याण तालुक्यातील राया गावाच्या परिसरातील एका ब्रिज खाली अर्धवट जळालेल्या स्थितीत महिलेचा मृतदेह आढळून आला आहे. हा मृतदेह पंचवीस वर्षीय महिलेचा असून चेहरा जळाल्याने तिची ओळख पटू शकली नाही. या अज्ञात महिलेचा मृतदेह आढळल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.


कल्याण तालुक्यातील राया गावाजवळील एका ब्रिज खाली रविवारी सकाळी सव्वादहाच्या सुमारास गावकऱ्यांना एका महिलेचा मृतदेह जळालेल्या स्थितीत आढळून आला होता. या घटनेची माहिती कल्याण तालुका पोलिसांना मिळताच त्यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा करीत महिलेचा मृतदेह ताब्यात घेतला. सापडलेला मृतदेह साधारणत: पंचवीस वर्षीय महिलेचा असून चेहरा जळाल्याने या महिलेची ओळख पटवता आली नाही. मृतदेहाला शवविच्छेदनासाठी कल्याणच्या रुक्मिणीबाई रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. कोणीतरी अज्ञात इसमाने अज्ञात कारणावरून या महिलेचा खून केला असावा व त्यानंतर पुरावा नष्ट करण्याच्या हेतूने महिलेला जाळून टाकले असावे. असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तविला आहे.


याप्रकरणी कल्याण तालुका पोलीस ठाण्यात अज्ञात मारेकऱ्या विरोधात हत्या करून पुरावे नष्ट करण्याचा गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्याचा अधिक तपास, कल्याण तालुका पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बालाजी पांढरे करीत आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details