ठाणे - खाद्य तेलांसह दूध आणि इतर जीवनावश्यक वस्तूंच्या किंमतीत दिवसेंदिवस भाववाढ होत आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना घरगाडा चालवले महागाईच्या काळात मुश्किल झाले आहे. त्यातच चोरट्यांनी आता महागड्या जीवनावश्यक वस्तू डल्ला मारत असल्याच्या घटनासमोर येत आहे. उल्हासनगर शहरातील दोन वेगवेगळ्या भागातील किरणा दुकान व दूध विक्री केंद्रातून खाद्य तेलासह दुधाचा कॅरेट चोरट्यानी लंपास केल्याचा प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला आहे. त्यामुळे भुरट्या चोरट्यांनी उल्हासनगर शहरात धुमाकूळ घालून पोलिसांची झोप उडवली आहे.
दिवसाढवळ्या खाद्य तेलाचा डब्बा रिक्षा टाकून चोरटा पसार -
पहिल्या घटनेत उल्हासनगर ३ नंबर मधील खट्टनमल चौकात असलेल्या किराणा दुकानात घडली आहे. या दुकानाच्या बाहेर खाद्य तेलांचे ८ ते १० डब्बे ठेवण्यात आले होते. त्यातच आज दिवसाढवळ्या दुपारच्या सुमारास एक चोरटा दुकानासमोर घुटमळत असतानाच, त्याने रिक्षाचालकाला दुकानाच्या कोपऱ्यात येण्यास इशारा केल्याचे सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसतो. त्यानंतर रिक्षा येताच अचानक दुकानाबाहेर असलेला १५ किलोचा खाद्य तेलाचा डब्बा उचलून चोरटा रिक्षातून धूम ठोकताना सीसीटीव्हीत कैद झाला.