महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Bullock Cart Race Dispute Gun Firing : बैलगाडा शर्यतीच्या वादातून गोळीबार प्रकरणी मुख्य आरोपीसह तिघांना सात दिवसांची पोलीस कोठडी

अंबरनाथ एमआयडीसी भागात (Ambernath MIDC firing case) दिवसाढवळ्या रविवारी दुपारच्या सुमारास झालेल्या अंदाधुंद गोळीबार प्रकरणात मुख्य आरोपी पंढरीशेठ फडके यांच्यासह तिघांना आज न्यायालयात हजर केले असता सात दिवसांची पोलीस कोठडी (police custody for seven days) सुनावली आहे. खळबळजनक बाब म्हणजे गोळीबार प्रकरणी केडीएमसीचे माजी नगरसेवक कुणाल पाटील (former KDMC corporator Kunal Patil) यांचेही नाव आरोपींमध्ये समाविष्ट करण्यात आले आहे. Latest news from Thane, Thane crime

police custody for seven days
सात दिवसांची पोलीस कोठडी

By

Published : Nov 14, 2022, 8:47 PM IST

Updated : Nov 14, 2022, 9:14 PM IST

ठाणे : अंबरनाथ एमआयडीसी भागात (Ambernath MIDC firing case) दिवसाढवळ्या रविवारी दुपारच्या सुमारास झालेल्या अंदाधुंद गोळीबार प्रकरणात मुख्य आरोपी पंढरीशेठ फडके यांच्यासह तिघांना आज न्यायालयात हजर केले असता सात दिवसांची पोलीस कोठडी (police custody for seven days) सुनावली आहे. खळबळजनक बाब म्हणजे गोळीबार प्रकरणी केडीएमसीचे माजी नगरसेवक कुणाल पाटील (former KDMC corporator Kunal Patil) यांचेही नाव आरोपींमध्ये समाविष्ट करण्यात आले आहे. मात्र याप्रकरणात माझा काडीमात्र संबंध नसून सूड भावनेतून अडकविले जात असल्याचे पाटील यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना खुलासा केला आहे. Latest news from Thane, Thane crime


बैलगाडा शर्यतीवरून वाद ..कल्याणच्या आडीवली गावातील बैलगाडा मालक राहुल पाटील यांच्यावर रविवारी दुपारी अंबरनाथच्या आनंद नगर एमआयडीसीत अंदाधुंद गोळीबार करण्यात आला होता. पनवेलच्या पंढरीनाथ फडके यांच्यासह त्यांच्या समर्थकांनी हा हल्ला केल्याचा व्हिडिओ समोर आला होता. राहुल पाटील आणि पंढरीनाथ फडके यांच्यात बैलगाडा शर्यतीवरून वाद असल्यामुळे हा हल्ला त्याच वादातून झाल्याचं सुरुवातीला सांगितलं जात होतं. मात्र पोलिसांनी गुन्हा दाखल केल्यानंतर हा हल्ला राजकीय स्पर्धेतून करण्यात आल्याचं धक्कादायक बाब समोर आली आहे.


३२ जणांविरोधात गुन्हा दाखल ..राहुल पाटील हे केडीएमसीच्या आडीवली प्रभागातून बाळासाहेबांची शिवसेना या शिंदे गटाकडून निवडणूक लढवण्याची तयारी करत आहेत. त्यामुळे त्याच प्रभागातील माजी नगरसेवक कुणाल पाटील यांचं त्यांच्याशी राजकीय वैमनस्य निर्माण झालं आहे. त्यातच राहुल पाटील आणि पंढरीनाथ फडके यांच्यात बैलगाडा शर्यतीवरून सुरू असलेल्या वादाचा फायदा घेत कुणाल पाटील आणि पंढरीनाथ फडके यांनी मिळून राहुल पाटील यांची हत्या करण्याचा कट रचल्याचा आरोप राहुल पाटील यांनी त्यांच्या जबाबात केलाय. त्यामुळे पोलिसांनी केडीएमसीचे माजी नगरसेवक कुणाल पाटील, महाराष्ट्र राज्य बैलगाडा संघटनेचे अध्यक्ष पंढरीनाथ फडके यांच्यासह एकूण ३२ जणांविरोधात हत्येचा प्रयत्न, कट रचणे आणि हत्यार कायद्यानुसार गुन्हा दाखल केलाय.


कुणाल पाटील यांनी मात्र आरोपांचे केले खंडन..पंढरीनाथ फडके यांच्यासह तिघांना अटक करून रात्री उशिरा शिवाजीनगर पोलीस ठाण्यात आणण्यात आलं. त्यांना आज दुपारी न्यायालयात हजर केले असता सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणात माजी नगरसेवक कुणाल पाटील यांचं नाव आल्यानंतर कुणाल पाटील यांनी मात्र आरोपांचे खंडन केले आहे.

Last Updated : Nov 14, 2022, 9:14 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details