महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

ठाणे : शासनाची बंदी झुगारून बैलगाडी शर्यती; आयोजकांवर गुन्हा दाखल - bullock cart race compition thane

अंबरनाथ तालुक्यातील मलंगगड भागात मागील काही दिवसांमध्ये कोरोनाचे रुग्ण हे झपाट्याने वाढले आहेत. मात्र, असे असताना उल्हासनगरच्या हिललाईन पोलीस ठाण्याच्या हद्दीत सर्रासपणे बैलगाडा शर्यती आयोजित केल्या जात असल्याचे अनेकवेळा समोर आले आहे.

Bullock cart race compitition in thane
शासनाची बंदी झुगारून बैलगाडा शर्यती

By

Published : May 26, 2021, 5:44 PM IST

ठाणे - अंबरनाथ तालुक्याच्या ग्रामीण भागात गेल्या महिनाभरात शासनाने बंदी घातलेल्या बैलगाडी शर्यतींचा धुरळा पुन्हा उडाल्याचे पाहवयास मिळाले आहे. तालुक्यातील काकडवाल येथील बैलगाडी शर्यतीचा प्रकार ताजा असतानाच, अंबरनाथ तालुक्यातील उसाटणे गावाच्या शिवारातील माळरानावर रविवारी पुन्हा बैलगाडीच्या शर्यतीचा धुरळा उडाल्याचा प्रकार एका व्हायरल व्हिडिओमुळे समोर आला आहे. एकीकडे ग्रामीण भागात कोरोनाने हाहाकार माजवला असताना उसाटणे गावच्या शिवारात मात्र सर्रास बैलगाडा शर्यती आयोजिती केल्याप्रकरणी हिललाईन पोलीस ठाण्यात विविध कलमा अंतर्गत गुन्हा दाखल करून पोलिसांनी तपास सुरू केला. प्रवीण काशिनाथ पाटील (वय,३७), सचिन विश्वनाथ भंडारी (वय, ३३) गुरुनाथ वसंता पाटील (वय, ४५) महेश गणेश पाटील (वय,३५) सर्व राहणार उसाटणे असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत.

परवानगी नसतानाही बैलगाडा शर्यतीचे आयोजन

हेही वाचा -..त्यामुळे राज्यात लॉकडाऊन पुन्हा वाढणार? मंत्री अस्लम शेख यांचे संकेत

बैलगाडा शर्यतींमध्ये लाखो रुपयांची उधळण -

अंबरनाथ तालुक्यातील मलंगगड भागात मागील काही दिवसांमध्ये कोरोनाचे रुग्ण हे झपाट्याने वाढले आहेत. मात्र, असे असताना उल्हासनगरच्या हिललाईन पोलीस ठाण्याच्या हद्दीत सर्रासपणे बैलगाडा शर्यती आयोजित केल्या जात असल्याचे अनेकवेळा समोर आले आहे. याआधी देखील काकडवाल गावात शर्यती आयोजित झाल्या होत्या. त्यानंतर रविवारी पुन्हा एकदा उसाटणे गावच्या शिवारात बैलगाडा शर्यतींचे आयोजन केले गेले होते. एकीकडे कोरोनामुळे नागरिकांना घराबाहेर न पाडण्याचे आवाहन पोलीस करत असताना दुरीकडे मात्र बैलगाडा शर्यती आयोजकांना दुसरा आवाहन करत असल्याच दिसून येत आहेत. विशेष म्हणजे लाखो रुपयांची उधळण या बैलगाडा शर्यतींमध्ये होत असल्याने पाहावयास मिळाले आहे. पोलीस मात्र दुर्लक्ष करत असल्याचा आरोप स्थानिक नागरिक करताना दिसून येत आहेत. यामुळे पोलिसांचे हे दुर्लक्ष ग्रामीण जनतेच्या जीवावर उठण्याची चिन्हे दिसून येत आहेत.

हेही वाचा -गौतम बुद्धांची जयंती साधेपणाने साजरी, दीक्षाभूमीवर मोजक्या व्यक्तींच्या उपस्थितीत बुद्धांना वंदन

राजकीय दबावांपोटी बैलगाडा शर्यतींकडे दुर्लक्ष -

सुर्वोच्च न्यायालयाने बैलगाडा शर्यतीवर बंदी घातली आहे. असे असताना उल्हासनगर परिमंडळ-४मध्ये असलेल्या हिललाईन पोलीस ठाण्याच्या हद्दीत बैलगाडा शर्यती आयोजित झाल्याच कशा? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. मात्र, राजकीय दबावांपोटी या शर्यतींकडे दुर्लक्ष केले जात आहे का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. विशेष म्हणजे गावोवागत होणाऱ्या हालचालींची पोलीस यंत्रणांना माहिती मिळावी यासाठी पोलीस यंत्रणांच्या नियुक्त्या केल्या जात असतात. मात्र, पोलीस यंत्रणांना बैलगाडा शर्यतींची माहिती पोलीस पाटलांच्या मार्फत मिळत असल्यास हिललाईन पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या संवेदनशील परिसरांमधील हालचालींची पोलीस यंत्रणांना कशी माहिती मिळणार, असा प्रश्न या घटनेनंतर उपस्थित झाला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details