ठाणे- अतिवृष्टीचा फटका बसल्याने लसणाची आवक कमी झाली आहे. त्यामुळे लसणाच्या दरात वाढ झाली आहे. लसणाचा होल सेलचा दर २२० रुपयांवर पोहोचला असून तो ६० रुपये पाव किलो झाला आहे. यंदा दसरा, दिवाळी सणात लसूण रडवणार आहे.
मध्यमवर्गीयांचे बजेट कोलमडले, कांद्यासह लसूणही महाग - लसूण पिक बातमी
राज्यात मराठवाडा वगळता सर्वत्र दमदार पाऊस झाल्याने पिकांसह भाजीपाला उत्पादनाला फटका बसला आहे. लसूण हे पिक जमिनीखाली वाढत असल्याने अतिवृष्टीने कुजली आहेत. त्याचे उत्पादनही घटले आहे.

हेही वाचा-उरणमधील ओएनजीसीमध्ये पुन्हा वायू गळती; नागरिकांमध्ये घबराट
राज्यात मराठवाडा वगळता सर्वत्र दमदार पाऊस झाल्याने पिकांसह भाजीपाला उत्पादनाला फटका बसला आहे. लसूण हे पिक जमिनीखाली असल्याने अतिवृष्टीने कुजली आहेत. त्याचे उत्पादनही घटले आहे. ज्या भागात कमी पाऊस पडतो त्या ठिकाणी जादा पाऊस पडल्याने लसणाचे दर वाढले आहेत. उत्तरप्रदेश आणि मध्यप्रदेशातून लसूण हा ठाण्यात विक्रीस येतो. यंदा लसणाचे उत्पन्न कमी झाल्याने दर वाढले आहेत. प्रतिकिलो २०० ते २२० रुपये लसणाची विक्री होत आहे. लसूण हा पदार्थ स्वयंपाक घरात फोडणीसाठी वापरत असल्याने ग्राहकांच्या खिशाला फटका बसत आहे.