महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Buddha Asthi Kalash Padayatra In Thane: थायलॅंडमधून आलेल्या बुद्ध अस्थी कलश पदयात्रेचे ठाणे जिल्ह्यात भव्य स्वागत - Buddha Asthi Kalash Padayatra

थायलंड देशातील ११० बौध्द भिक्खू संघासह तथागत गौतम बुद्ध यांचे अस्थी कलश पदयात्रेचे मंगलमय वातावरणात हजारो उपासकांकडून भिवंडी तालुक्यातील मुंबई नाशिक महामार्गावरील पडघा येथे आज दुपारी भव्य स्वागत करण्यात आले. भिवंडी तालुक्यातील पडघा विभागात प्रथमच तथागत भगवान गौतम बुध्द अस्थिधातू कलश वंदन आणि आंतरराष्ट्रीय बौध्द भिक्खू संघ थायलंड यांची भव्य धम्मपद यात्रा स्वागत समारंभ रविवार १२ फेब्रुवारी २०२३ रोजी दुपारी काढण्यात आली.

Buddha Asthi Kalash Padayatra In Thane
कलश रथ

By

Published : Feb 12, 2023, 8:30 PM IST

बुद्ध अस्थी कलशाचे उत्साहात स्वागत

ठाणे : तालुक्यातील क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले आणि विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर संयुक्त जयंती महोत्सव पडघे विभाग यांच्या वतीने पडघा टोलनाका जवळील गोपाळास हॉटेल, मुंबई-नाशिक महामार्गावर भव्य स्वागत करण्यात आले. १७ जानेवारीपासून परभणी येथून परभणी ते चैत्यभूमीकडे निघालेल्या तथागतांच्या अस्थी कलश धम्मयात्रा ११ फेब्रुवारी रोजी नाशिकहून ठाणे जिल्ह्यात कसाराघाट मार्गे शहापूर तालुक्यात दाखल झाली होती. आज ही पदयात्रा भिवंडी तालुक्यात दाखल झाल्याने महाकारुणी तथागतांच्या अस्थींचे दर्शन मिळावे, अशी उपासकांची इच्छा पूर्ण झाली.

बुद्धांच्या अस्थीच्या दर्शनाचा लाभ: बुद्धांच्या अस्थी कलशच्या मंगलमय आगमना सोबतच थायलंडच्या भिक्खू संघाचे पदयात्रा गेल्या दोन दिवसांपासून ठाणे जिल्ह्यात दाखल झाल्यानंतर ठिकठिकाणी दर्शनासाठी उपासकांच्या रांगा पाहायला मिळाल्या. हजारो उपासक उपासिका मनोभावे दर्शन घेऊन बुद्ध चरणी लीन झाले. अडीच हजार वर्षानंतर तथागत गौतम बुद्धांच्या अस्थींच्या दर्शनाचा लाभ ठाणे जिल्ह्यातील उपासकांना मिळाल्याचे सांगण्यात आले.

दर्शनासाठी रांगा: तथागत गौतम बुद्धांच्या अस्थी कलश पदयात्रेत जागतिक धर्मगुरू भंते तेप्रिवय यधिष्ठी, भंते लॉंगफुजी, भंते सोंगसेक फॅन्टफियन यांच्यासह मुंबई येथील भंते विनयबोधी, भंते लामाजी भंते शांतीरत्न, भंते बोदानंद समवेत ठाणे जिल्ह्यातील भंते सहभागी झाले. अस्थिकलश पदयात्रेच्या मार्गावर वाहतूक शाखा व समता सैनिक दलाच्या जवानांनी नियोजनबद्ध नियंत्रण ठेवण्यात आले. यावेळी पडघा विभागातील नागरिकांना तथागत भगवान बुध्द यांच्या अस्थिधातू कलशाचे वंदन करायला महामार्गावर ४ ते ७ किलोमीटरपर्यत लांबच्या लांब रांगा लागल्या आहेत.

आयोजनाची भव्य तयारी :थायलंड येथील ११० पुजनीय बौध्द भिक्खू संघ, धम्मपद यात्रेचे स्वागत क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले व विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर संयुक्त जयंती महोत्सव पडघे विभाग यांच्यावतीने आहे. पडघा व भिवंडी परिसरातील नागरिकांची पांढरे शुभ्र वस्त्र परिधान करून हजारोच्या संख्येने उपस्थित पाहावयास मिळाली. बुद्धांच्या अस्थी कलश पदयात्रा उद्या भिवंडी तालुक्यातील दुसऱ्या टप्यात रांजणोली बायपास मार्गे कल्याणमध्ये आगमन होणार असल्याचे त्यांच्या स्वागताची जोरदार तयारी आयोजकांकडून करण्यात येत आहे.

हेही वाचा :Maulana Arshad Madani: 'अल्लाह आणि ओम एकच..', मौलाना अरशद मदनी यांच्या विधानानंतर झाले वादंग, नेमकं काय म्हटले मौलाना?

ABOUT THE AUTHOR

...view details