महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Thane Crime : पैशाच्या वादातून शिंदे गटाच्या प्रमुखाची जुगार अड्ड्यावर निर्घृण हत्या, चौघांना पोलिसांनी ठोकल्या बेड्या - brutal murder of Shinde group head

उसनवारी येथे पैशाच्या वादातून शिंदे गटाच्या प्रमुखाची जुगार अड्ड्यावर निर्घृण हत्या करण्यात आली. शब्बीर सलीम शेख (वय ४५) असे हत्या झालेल्या शिवसेना शिंदे गटाच्या शाखा प्रमुखाचे नाव आहे. या प्रकरणी विक्रम उर्फ विकी राजेंद्र कवठणकर ( वय २६, ) दिनेश राजेंद्र कवठणकर ( वय २३ ) , दोघेही रा. विर तानाजी नगर, उल्हासनगर), प्रशांत उर्फ सलाड सुरेश तायडे ( वय, २४ रा. पाटीलनगर, मांडा टिटवाळा ) तकबीर दादाजी बोराळे, (वय २३, रा. राहुल नगर उल्हासनगर), यांना अटक करण्यात आली आहे.

Thane Crime
Thane Crime

By

Published : May 28, 2023, 10:13 PM IST

मोतीचंद राठोड, सहाय्यक पोलीस आयुक्त

ठाणे :उल्हासनगर शहरातील शिंदे गटाच्या शिवसेना शाखा प्रमुखाची पूर्वीच्या भांडणासह पाच हजार रुपये उसेन पैसे देण्यास नकार दिल्याने हत्या करण्यात आली आहे. शब्बीर सलीम शेख (वय ४५) असे हत्या झालेल्या शिवसेना शिंदे गटाच्या शाखा प्रमुखाचे नाव आहे. टोळीने शेख यांच्यावर धारधार चाकू सुऱ्याने २० ते २० सपासप वार करून जुगाराच्या अड्ड्यावर सपासप वार केल्याची धक्कादायक घटना २६ मे रोजी घडली होती. ही घटना उल्हासनगर शहरातील कॅम्प क्रमांक पाच या भागात असलेल्या जय जनता कॉलनीमध्ये घडली होती.

पाच जणांना अटक :याप्रकरणी हिल लाईन पोलीस ठाण्यात सहा जणांच्या टोळी विरोधात हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्यातील मुख्य आरोपीसह चार मारेकऱ्यांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. चार आरोपीमध्ये दोन सख्या भावाचा समावेश असल्याचे समोर आले आहे. विक्रम उर्फ विकी राजेंद्र कवठणकर ( वय २६, ) दिनेश राजेंद्र कवठणकर ( वय २३ ) , दोघेही रा. विर तानाजी नगर, उल्हासनगर), प्रशांत उर्फ सलाड सुरेश तायडे ( वय, २४ रा. पाटीलनगर, मांडा टिटवाळा ) तकबीर दादाजी बोराळे, (वय २३, रा. राहुल नगर उल्हासनगर), असे २४ तासात अटक केलेल्या हल्लेखोरांची नावे आहेत.

जुगार अड्ड्यावर सपासप वार :मृतक शब्बीर हा उल्हासनगर कॅम्प क्रमांक पाच या भागात जय जनता कॉलनीमध्ये कुटूंबासह राहत होता. काही दिवसापासून मुख्य हल्लेखोर विक्रम उर्फ विकी या गुंडांशी पूर्ववैमनस्यातून मृत शब्बीरच्या भावाशी भांडण झाले होते. त्यावेळी दोन्ही गटावर हिललाईन पोलीस ठाण्यात परस्पर गुन्हे दाखल करण्यात आले होते. याच भाडणंचा राग तसेच मुख्य आरोपीने ५ हजार रुपये उसने मागितले होते. मात्र, मृतक शब्बीरने देण्यास नकार दिला होता. याच दोन्ही वादातून २६ मे रोजी मध्यरात्रीच्या सुमारास जय जनता कॉलनीमध्ये असलेल्या जुगाराच्या अड्ड्यावर त्याच्यावर हल्ला करण्यात आला. मुख्य आरोपी विक्रमसह त्याच्या टोळीने धारधार चाकू, सुरे खुले आम हातात घेऊन त्याचा पाठलाग त्याच्यावर जुगार अड्ड्यावर सपासप वार केले. हल्यावेळी जुगार खेळणाऱ्या जमावामध्ये एकच पळापळ झाली होती. दुसरीकडे हल्लेखोर शब्बीरवर हल्ला करताना सीसीटीव्ही कैद झाले होते.

सात जणांवर हत्येचा गुन्हा :हल्लेखोर हे चाकू , सुरे असे धारदार हत्यार घेऊन आले होते. हल्लेखोरांनी शब्बीर शेखवर २० ते २५ वार केले. त्यानंतर गंभीर जखमी अवस्थेत शब्बीर शेख यांना क्रिटी केअर हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले होते. मात्र, त्यांची परिस्थिती गंभीर असल्याने त्यांना कल्याण येथील एका खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र शब्बीरचा २७ मे रोजीच्या पहाटेच्या सुमारास उपचारापूर्वी मृत्यू झाला आहे. याप्रकरणी उल्हासनगरच्या हिललाईन पोलीस ठाण्यात विक्रमसह त्याच्या टोळीतील सहा ते सात जणांवर हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

शहारत गुन्हेगारीमध्ये वाढ : पोलिसांनी हल्लेखोरांचा शोध सुरू घेण्यासाठी स्थानिक पोलिसांसह उल्हासनगर गुन्हे शाखेच्या पथकाने समांतर तपास सुरू केला. गुन्हयातील हल्लेखोर दिनेशला हिल लाईन पोलिसांनी ताब्यात घेऊन अटक केली. त्यानंतर विठ्ठलवाडी पोलीस ठाण्याचे गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक हर्षल राजपूत यांना गुप्त माहिती मिळाली होती. गुन्हयातील तीन हल्लेखोरांसह मुख्य आरोपी विक्रम हा उल्हासनगरमधील संभाजी चौक भागात येत असल्याची माहिती पोलिसांना खबऱ्याने दिली होती. या माहितीच्या आधारे आज पहाटे त्या ठिकाणी राजपूत यांनी पथकासह सापळा रचला असता मुख्य हल्लेखोर विक्रम उर्फ विकी, प्रशांत उर्फ सलाड, तकबीर या तिघांना अटक केल्याची माहिती सहाय्यक पोलीस आयुक्त मोतीचंद राठोड यांनी दिली. उल्हासनगरात मोठ्या प्रमाणात जुगार अड्ड्यासह इतरही गोरखधंद्याचे पेव फुटल्याचा पोलिसांनी केलेल्या कारवाईत दिसून येते. मात्र पोलिसांनी एकाद्या जुगार आड्यावर धाड टाकली कि, किमान १० ते १५ दिवस तो जुगार अड्डा बंद राहतो. त्यानंतर मात्र, पुन्हा जैसे थे जुगार अड्डे सुरूच असल्याचे दिसून आल्याने त्यामुळे शहारत गुन्हेगारीमध्ये मोठी वाढ झाल्याचे विविध पोलीस ठाण्यात नोंद झालेल्या गुन्ह्यावरून दिसून येत आहे.

हेही वाचा -

  1. Mumbai Crime : गँगविरोधात साक्ष दिल्याने काॅलेज तरुणावर कटरने सपासप वार
  2. Terrorists Killed in Manipur : मणिपूर हिंसाचारानंतर आतापर्यंत 30 दहशतवादी ठार, आसाम रायफल्सची कारवाई

ABOUT THE AUTHOR

...view details