ठाणे -२५ डिसेंबरपासून बेपत्ता असलेल्या तरुणाचा मृतदेह चाविंद्रा येथे निर्जनस्थळी शुक्रवारी आढळला. हा मृतदेह छिन्न विच्छिन्न अवस्थेत होता. कृष्णा केशरवाणी (२८ ) असे मृतदेह आढळून आलेल्या तरुणाचे नाव असून तो भिवंडी शहरातील घुंगट नगर परिसरातून बेपत्ता झाला होता. याप्रकरणी सोहेल खान या भंगार विक्रेत्याला अटक करण्यात आली आहे. धक्कादायक बाब म्हणजे मृतक व आरोपी दोन्ही भंगार विक्रीचा व्यवसाय करीत होते. याच व्यवसायच्या वादातून कृष्णा केशरवाणी याची निर्घृण हत्या सोहेल खान याने केल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे.
डीसीपी कार्यलयासमोर आंदोलन -
कृष्णा केशरवाणी हा शुक्रवारी संध्याकाळी ५ वाजता घुंगट नगर येथून भंगार खरेदी करण्यासाठी निघाला. परंतु तो परत आला नाही. रात्री उशिरापर्यंत कुटुंबियांनी त्याचा शोध घेतला. पण तो न सापडल्याने त्यांनी भिवंडी शहर पोलीस ठाण्यात तो बेपत्ता असल्याची नोंद करण्यात आली. त्याचा सर्वत्र शोध सुरू असतानाच भिवंडी तालुक्यातील चिंबीपाडा या आडवाटेच्या रस्त्यावर त्याची दुचाकी आढळून आल्याने त्याच्या घरच्यांची धास्ती वाढली. पोलिसांनी आपल्या मुलाचा तत्काळ शोध घ्यावा, यासाठी कुटुंबियांसह शेकडो नागरिकांनी पोलीस उपायुक्त कार्यालयाबाहेर आंदोलन केले होते.
आर्थिक नुकसान करायचे म्हणून हत्या -