महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Brother Killed Sister : दया दाखवणाऱ्या बहिणीचा भावाने केला खून, दोन दिवस मृतदेहाजवळ होता बसून - आदित्य हौसिंग सोसायटी

पत्नीची हत्या केल्यानंतर शिक्षा भोगून आलेल्या भावावर दया दाखवत रहायला छत देणाऱ्या बहिणीचाच सख्ख्या भावाने चाकूने भोसकून हत्या ( Brother Killed Sister ) केल्याची धक्कादायक घटना उल्हासनगर शहरात ( Ulhasnagar Crime ) घडली आहे. खळबळजनक बाब म्हणजे बहिणीची हत्या करून आरोपी भाऊ दोन दिवस तिच्या मृतदेहाजवळ बसून असल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी मध्यवर्ती पोलीस ठाण्यात बहिणीच्या हत्येचा गुन्हा दाखल करून आरोपी भावाला पोलिसांनी अटक केली आहे. योगेश म्हैसमाळे (वय 47 वर्षे) ,असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. अरुणा म्हैसमाळे (वय 45 वर्षे), असे हत्या झालेल्या बहिणीचे नाव आहे.

aruna mhaismale
मृत अरुणा म्हैसमाळे

By

Published : Dec 4, 2021, 6:56 PM IST

Updated : Dec 5, 2021, 3:15 PM IST

ठाणे -पत्नीची हत्या केल्यानंतर शिक्षा भोगून आलेल्या भावावर दया दाखवत रहायला छत देणाऱ्या बहिणीचाच सख्ख्या भावाने चाकूने भोसकून हत्या ( Brother Killed Sister ) केल्याची धक्कादायक घटना उल्हासनगर शहरात ( Ulhasnagar Crime ) घडली आहे. खळबळजनक बाब म्हणजे बहिणीची हत्या करून आरोपी भाऊ दोन दिवस तिच्या मृतदेहाजवळ बसून असल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी मध्यवर्ती पोलीस ठाण्यात बहिणीच्या हत्येचा गुन्हा दाखल करून आरोपी भावाला पोलिसांनी अटक केली आहे. योगेश म्हैसमाळे (वय 47 वर्षे) ,असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. अरुणा म्हैसमाळे (वय 45 वर्षे), असे हत्या झालेल्या बहिणीचे नाव आहे.

घटनास्थळ

मृतदेहाला दुर्गंधी सुटल्याने प्रकार आला समोर

उल्हासनगर शहरातील कॅम्प क्र. तीन भागात सी ब्लॉक, सचदेव नगर परिसरात आदित्य हौसिंग सोसायटीच्या इमारतीत मृत अरुणा आणि त्यांचा भाऊ योगेश हे सोबत राहत होते. त्यातच आरोपी योगेशने दोन दिवसांपूर्वी बहीण अरुणाची राहत्या घरातच चाकू भोसकून हत्या केली. त्यानंतर तो त्याच घरात राहत होता. मात्र, मृतदेहाची दुर्गंधी सुटल्याने शेजारच्यांनी मध्यवर्ती पोलिसांना या घटनेची माहिती दिली. तसेच आरोपी योगेशचा नेहमीचा रिक्षाचालकाला मोबाईलवर संपर्क करून बहिणीची हत्या केल्याचे सांगितले. त्यांनतर शुक्रवारी (दि. 3) सायंकाळच्या सुमारास मध्यवर्ती पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड, सुहास आव्हाड, बंडगर यांच्या पथकाने घटनास्थळी पोहोचून पंचनामा करीत अरुणाचा मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी मध्यवर्ती रुग्णालयात हलविण्यात आला आहे.

गर्भवती पत्नीची केली होती हत्या

आरोपी योगेश हा मानसिक रुग्ण असल्याची माहिती शेजारच्यांनी व पोलिसांनी दिली असून दहा वर्षापूर्वीही आरोपी योगेशने त्याच्या गर्भवती पत्नीची हत्या केली होती. त्याप्रकरणी तो पाच वर्षे तुरुंगात होता. तुरुंगातून बाहेर आल्यानंतर त्याच्याकडे घर, नोकरी नसल्याने बहिणीने भावाला आपल्या घरी राहण्यास सांगितले होते. पण, भावानेच बहिणीची हत्या केली. आज (दि. 4) दुपारच्या सुमारास त्याला न्यायालयात हजर करणार असल्याचे पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले.

हे ही वाचा -Bhiwandi Fire : कपड्यांच्या गोदामांना भीषण आग; पाच गोदाम जळून खाक

Last Updated : Dec 5, 2021, 3:15 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details