ठाणे- क्षुल्लक वादातून मेहुण्याने सख्या भाऊजींची धारदार हत्याराने निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही घटना भिवंडी तालुक्यातील धामणगाव येथे घडली आहे. अमिन जलील शेख ( ४० ) असे हत्या झालेल्या भाऊजींचे नाव आहे. तर अरमान सलीम शेख (३० ) असे आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी अरमान शेख याला अटक केली आहे.
क्षुल्लक वादातून मेहुण्याकडून भाऊजीची हत्या; आरोपी गजाआड - Amin Jalil Sheikh murder case thane
क्षुल्लक वादातून मेहुण्याने सख्या भाऊजींची धारदार हत्याराने निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही घटना भिवंडी तालुक्यातील धामणगाव येथे घडली आहे. अमिन जलील शेख (४०) असे हत्या झालेल्या भाऊजींचे नाव आहे. तर अरमान सलीम शेख (३० ) असे आरोपीचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, भिवंडी तालुक्यातील धामणगाव येथे ए-वन केस कर्तनालय नावाचे दुकान आहे. त्या दुकानात आरोपी अरमान सलीम शेख हा देखील मृतक अमीनसोबत काम करीत होता. मात्र अरमान यास दारू व नशेच्या पदार्थांचे व्यसन होते. त्यामुळे अमिन हा त्यास विरोध करून नशा करण्यास मनाई करायचा. त्यावरून दोघांमध्ये मध्यरात्री कडाक्याचे भांडण झाले. यावेळी अरमान याने रागाच्या भरात आपले भाउजी अमिन याच्या डोक्यात धारदार हत्याराने प्रहार केला. त्यामध्ये तो जागीच ठार झाला आहे.
या प्रकरणी भिवंडी तालुका पोलिसांनी अरमान विरोधात खुनाचा गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे. त्यास सोमवारी भिवंडी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याची रवानगी पोलीस कोठडीत केली आहे. अधिक तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय हजारे करीत आहे.