ठाणे -वडिलोपार्जित असलेल्या घराच्या हिस्सेवाटीवरून दोघा भावांमध्ये वाद झाला. या वादातून लहान भावाने मोठ्या भावाच्या अंगठ्याला कडाळून चावा घेतल्याने हाताच्या अंगठ्याचा समोरील भाग तुटून पडला आहे. याप्रकरणी अंबरनाथ पोलीस ठाण्यात हल्लेखोर भावाविरोधात विविध कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला. श्रीधर जमण्णा पिटला, असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. तर, शंकर जमण्णा पिटला ( वय,४४ ) असे जखमीचे नाव ( brother broke another thumb in ambarnath ) आहे.
शंकर हा रिक्षाचालक असून, तो अंबरनाथ पश्चिम भागातील न्यू बालाजी नगर परिसरात कुटुंबासह रहातो. तर, आरोपी श्रीधर हा अंबरनाथ मध्येच वेगळा राहतो. गेल्या काही दिवसापासून शंकर राहत असलेल्या घरावरून दोघा भावात वाद सुरु होता. याच वादातून आरोपी श्रीधर हा २० जुलै रोजी सांयकाळच्या सुमारास शंकरच्या घरी येऊन 'हे घर माझ्या बापाचे असून, मला त्या मधला हिस्सा पाहिजे' असा वाद घातला.