महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

धक्कादायक ! अल्पवीयन मुलीवर प्रियकराचा अत्याचार, पीडिता गभर्वती - Thane Crime News

एका १६ वर्षीय मुलीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून लग्नाचे आमिष दाखवत तिच्यावर अत्याचार केल्याची घटना घडली आहे. धक्कादायक बाब म्हणजे पीडिता गर्भवती राहिल्याने अत्याचाराचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी कोळसेवाडी पोलीस ठाण्यात आरोपी प्रियकराविरोधात अत्याचारासह पोक्सो कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Thane rape case
अल्पवीयन मुलीवर प्रियकराचा अत्याचार

By

Published : Dec 20, 2020, 8:30 PM IST

ठाणे -एका १६ वर्षीय मुलीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून लग्नाचे आमिष दाखवत तिच्यावर अत्याचार केल्याची घटना घडली आहे. धक्कादायक बाब म्हणजे पीडिता गर्भवती राहिल्याने अत्याचाराचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी कोळसेवाडी पोलीस ठाण्यात आरोपी प्रियकराविरोधात अत्याचारासह पोक्सो कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांकडून आरोपीचा शोध घेण्यात येत असून, रमेश कुमार (वय,२०) असे गुन्हा दाखल झालेल्या प्रियकराचे नाव आहे.

पीडितेला रुग्णालयात दाखल केल्यानंतर घटना आली समोर

पीडिता कल्याण पूर्वेतील नांदवली परिसरात राहत असून, याच परिसरात आरोपी रमेश राहतो. ओळखीचा फायदा घेत, आरोपीने तिला प्रेमाच्या जाळ्यात ओढले. त्यांनतर तिला लग्नाचे आमिष दाखून ऑक्टोबर महिन्यात तिच्या राहत्या घरातच तिच्यावर अत्याचार केला. आरोपीच्या अत्याचारामुळे पीडिता गभर्वती राहिली. मात्र घडलेला प्रसंग तिने घरच्यांना सांगितला नव्हता. मात्र त्यांनतर तिच्या पोटात दुखत असल्याने तिला घरच्यांनी कल्याण पश्चिम परिसरातील एका खासगी रुग्णालयात दाखल केले. तेव्हा ही मुलगी गर्भवती असल्याची माहिती तिच्या नातेवाईकांना मिळाली. नातेवाईकांनी पीडितेला घेऊन, कोसळेवाडी पोलीस स्टेशन गाठले. याप्रकरणी आरोपी रमेशविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीचा शोध सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

ABOUT THE AUTHOR

...view details