ठाणे : Boyfriend Kidnap Girlfriend : बदलापूरहुन सीएसटीच्या दिशेने जाणाऱ्या धावत्या लोकलमधून १९ वर्षीय प्रियकरानं अल्पवयीन प्रेयसीचं अपहरण (Kidnapping Minor Girlfriend) केल्याची घटना बदलापूर ते कल्याण रेल्वे स्थानका दरम्यान घडली होती. याप्रकरणी कल्याण लोहमार्ग पोलीस ठाण्यात (kalyan lohmarg police station) अपहरणचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांनी अपहरणकर्ता प्रियकराचा शोध घेऊन त्याला साताऱयातील शेंद्रे गावातून ताब्यात घेऊन प्रेयसीची सुटका केली.
लोकलमधून अल्पवयीन प्रेयसीचे अपहरण : रेल्वे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित अल्पवयीन तरुणी ही काही दिवसापूर्वी तिच्या बदलापुरात राहणाऱ्या मामाकडे आली होती. त्यातच १२ ऑक्टोंबर रोजी बदलापूर रेल्वे स्थानकातून दुपारी १२ वाजून ४ मिनिटाच्या लोकल ट्रेनमध्ये तिच्या मामाने तिला एकटीला विक्रोळीला जाण्यासाठी बसवून ते निघून गेले. मात्र, संध्यकाळपर्यत अल्पवयीन मुलगी घरी पोहोचली नसल्याची माहिती तिच्या मामाला घरच्यांनी दिली. त्यानंतर तिच्या इतर मैत्रिणीकडे विचारणा करण्यात आली. मात्र, ती कोठेच आढळून आली नाही. त्यामुळे तिच्या मामाने कल्याण लोहमार्ग पोलीस ठाण्यात बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली होती. कल्याण रेल्वे पोलिसांनी त्यांच्या तक्रारीवरून भादंवि कलम ३६३ प्रमाणे अपहरणा गुन्हा १२ ऑक्टोंबर रोजी दाखल करून घेतला होता.
सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपास : घटनेचे गांभीर्य ओळखून कल्याण लोहमार्ग आणि कल्याण रेल्वे गुन्हे शाखेच्या पथकानं स्थानकांवरील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तसेच अपहरण झालेल्या मुलीच्या मित्र - मैत्रिणीकडे चौकशी केली असता, तिच्या प्रियकराचे नाव समोर आले. त्यानंतर कल्याण रेल्वे गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरशुद्दिन शेख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अशोक होळकर आणि त्यांच्या पथकाने तपास सुरू केला. अपहरण झालेल्या अल्पवयीन मुलीला घेऊन ओमकार हा सातारा जिल्ह्यातील त्याच्या शेंद्रे गावात असल्याची माहिती पोलीस पथकाला मिळाली. पथकाने त्या गावात सापळा रचला असता गावातील वेचले रोडवर अपहरण झालेली मुलगी दिसली. काही वेळाने ओमकारही एका घरातून बाहेर पडताना दिसला. यावेळी आधीच सापळा रचून बसलेले रेल्वे पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले.
दोघांना घेतले ताब्यात :ओमकारकडे रेल्वे पोलिसांनी अधिक चौकशी केली असता, त्याने प्रेमसंबंधातून आपण प्रेयसीला घेऊन गेल्याची कबुली दिली. तर अल्पवयीन मुलीला तिच्या पालकांच्या स्वाधीन करून लोहमार्ग पोलीस पुढील कारवाई करणार असल्याची माहिती, वरिष्ठ पोलीस निरीक्षक अर्चना दुसाने यांनी दिली.
हेही वाचा -
- Thane Crime News: इंस्टाग्रामवर जुळलं सूत; रेल्वेतून अल्पवयीन प्रेयसीचे अपहरण करणाऱ्या प्रियकराला बेड्या..
- Attempt To Abduct Hindu Girl : पब्जी गेम खेळत हिंदू मुलीशी ओळख; महाराष्ट्रात येऊन बिहारच्या नराधमांकडून तरुणीच्या अपहरणाचा प्रयत्न
- Thane Crime : कहरच! गर्लफ्रेंडचे दुसऱ्यासोबत लग्न झाल्याचा राग; बॉयफ्रेंडने थेट त्यांचं पोरगंच पळवलं