ठाणे- एकाद्या हिंदी चित्रपटाला साजेशी घटना समोर आली आहे. एका २१ वर्षीय तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिच्याशी लग्न करण्याच्या बहाण्याने २४ वर्षीय दगाबाज प्रियकराने अत्याचार केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. याप्रकरणी पीडित तरुणीच्या तक्रारीवरून मानपाडा पोलीस ठाण्यात प्रियकरावर अत्याचाराचा गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली आहे. शिवाजी फड असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.
७ महिन्यापासून पीडितेवर अत्याचार ..
पीडित तरुणी कल्याण पूर्वेत राहणारी असून ती एका खासगी कंपनीत नोकरी करते. तर दगाबाज हा कल्याण पूर्वेतील नेतीवली परिसरात राहतो. त्यामुळे या दोघांची फ्रेबुवारी २०२१ मध्ये ओळख झाली. याच ओळखीचा फायदा घेत आरोपी तरुणाने पीडित तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात अडकवले. त्यांनतर लग्नाचे आमिष दाखवून फ्रेबुवारी ते सप्टेंबर असे ७ महिने तिच्यावर डोंबिवलीतील एका लॉजमध्ये वारंवार अत्याचार केला. त्यानंतर मात्र तरुणाने पीडितेस लग्नास नकार दिला, त्यावेळी पीडितेचला आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले.