ठाणे - अनैतिक संबंधाचा जाब विचारल्याने संतप्त प्रियकराने प्रेयसीला बेदम मारहाण करत तिच्या डोक्याचे केस कापून चेहरा विद्रूप करण्याचा प्रयत्न केल्याची घटना समोर आली आहे. ही घटना अंबरनाथ तालुक्यातील वांगणी गावात घडली आहे.
प्रेयसीने विचारला अनैतिक संबंधाचा जाब, प्रियकराने केले असे कृत्य - वांगणी
लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या प्रेयसीने आपल्या प्रियकराचे इतर महिलांशीही संबंध असल्याच्या संशयावरून त्याला जाब विचारला. त्यामुळे संतप्त झालेल्या प्रियकराने तिला बेदम मारहाण करत तिच्या डोक्याचे केस कापून तिचा चेहरा विद्रूप करण्याचा प्रयत्न केला. ही घटना अंबरनाथ तालुक्यातील वांगणी गावात घडली आहे. या प्रकरणात प्रियकरावर अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
खळबळजनक बाब म्हणजे लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत असताना त्या नराधमाने पीडितेला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर वांरवार अत्याचार केला. याप्रकरणी पीडित प्रेयसीने कुळगाव पोलीस ठाण्यात प्रियकराविरोधात अत्याचार आणि बेदम मारहाणीचा गुन्हा दाखल केला आहे. अमित शेलार, असे गुन्हा दाखल झालेल्या प्रियकराचे नाव आहे.
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबईतील एका बारमध्ये पीडित तरुणी वेटरचे काम करत होती. त्या बारमध्ये आरोपी अमित मद्यपान करण्यासाठी जात होता. यामुळे दोघांमध्ये ओळख होऊन प्रेमसंबंध जुळले होते. त्यांनतर आरोपी अमित हा वांगणी गावातील एका घरात तिच्यासोबत लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत होता. त्यानंतर त्याने या घरात पीडितेला लग्नाचे अमिष दाखवत तिच्यावर वारंवार अत्याचार केल्याचा आरोप पीडितेने पोलिसांना दिलेल्या जबाबात नोंदवले आहे. त्याचप्रमाणे आरोपी अमितचे इतर महिलांशी अनैतिक संबंध असल्याचा संशय आल्याने त्याला जाब विचारला होता. त्यामुळे संतप्त झालेल्या अमितने शिवीगाळ करत बेदम मारहाण केली. तसेच डोक्याचे केस कापून चेहरा विद्रुप केल्याचेही तिने पोलिसांना दिलेल्या जबाबात नमूद केले आहे. कुळगाव पोलिसांनी पीडितेच्या तक्रारीवरून आरोपीवर विविध कलमांन्वये गुन्हे दाखल करून तपास सुरु केला आहे.