महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

प्रियकराने फसवल्याने प्रेयसीची गळफास घेऊन आत्महत्या, आरोपीस अटक - committed suicide with hanging

चारित्र्यावर संशय घेत प्रियकराने लग्नास नकार दिल्यामुळे 20 वर्षीय प्रेयसीने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. याप्रकरणी प्रियकर बबन उर्फ गोविंद राजू कांबळे (वय 19 वर्षे), यास नारपोली पोलिसांनी अटक केली आहे.

नारपोली पोलीस ठाणे
नारपोली पोलीस ठाणे

By

Published : Nov 17, 2021, 8:29 PM IST

ठाणे - चारित्र्यावर संशय घेत प्रियकराने लग्नास नकार दिल्यामुळे 20 वर्षीय प्रेयसीने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. याप्रकरणी प्रियकर बबन उर्फ गोविंद राजू कांबळे (वय 19 वर्षे), यास नारपोली पोलिसांनी अटक केली आहे.

'आता मी तुझ्याशी लग्न करणार नाही, तुझे तू बघून घे'

मृत तरुणी भिवंडीतील अण्णाभाऊ साठे नगर येते कुटूंबासह राहत होती. त्यातच मे, 2019 पासून आरोपी बबन आणि सुवर्णामध्ये ओळख निर्माण होऊन त्याचे रूपांतर प्रेमात झाले. त्यांनतर प्रियकराने लग्नाचे आमिष दाखवत दोन वर्षे प्रेमसंबंध ठेवले. मात्र, काही दिवसांपासून तो तिच्या चारित्र्यावर संशय घेत 'तू कॉलेजला जाते, तिकडे कोणाशी तरी तुझे संबंध असतील', असे बोलत वाद घातल होता.मोबाईलवर फोन करून सतत पैशाची मागणी करत होता. त्यानंतर 'आता मी तुझ्याशी लग्न करणार नाही, तुझे तू बघून घे', असे म्हणाला. या त्रासास कंटाळून तरुणीने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे.

गुन्हा दाखल होताच काही तासातच आरोपीला बेड्या..

तरुणीला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी तिच्या भावाने नारपोली पोलीस ठाण्यात मंगळवारी (दि. 16) सायंकाळच्या सुमारास तक्रार दिली. तक्रारीवरुन पोलिसांनी गुन्हा दाखल करत बबनला भिवंडी शहरातून ताब्यात घेऊन अटक केली आहे. या घटनेचा पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक व्ही. बी. बढे करीत आहेत.

हे ही वाचा -धक्कादायक! गर्लफ्रेंडच्या वादातून अल्पवयीन मुलांमध्ये राडा; एकाच्या मांडीत खुपसला चाकू

ABOUT THE AUTHOR

...view details