महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

भाईंदरमध्ये वीज अंगावर पडून १४ वर्षीय मुलाचा मृत्यू - west uttan patan bandar

भाईंदरमध्ये 14 वर्षीय मुलाचा वीज अंगावर पडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. भाईंदर पश्चिममधील उत्तन पातान बंदर येथे ही घटना घडली आहे.

पश्चिममधील उत्तन पातान बंदर
वीज अंगावर पडून मुलाचा मृत्यू

By

Published : Oct 22, 2020, 7:35 AM IST

मीरा भाईंदर (ठाणे) -भाईंदरमध्ये 14 वर्षीय मुलाचा वीज पडून दुर्दैवी मृत्यु झाल्याची घटना घडली आहे. भाईंदर पश्चिममधील उत्तन पातान बंदर येथे बुधवारी सायंकाळी 5.30 च्या सुमारास ही घटना घडली आहे.
सुप्रियन भंडारी असे मृत मुलाचे नाव आहे. भाईंदर पश्चिममधील उत्तन भागात पातान बंदर येथे राहणारा सुप्रियन आपल्या मित्रांसोबत सायंकाळी खेळत होता. साडे पाचच्या सुमारास पाऊस सुरू झाला होता. त्याच वेळी सुप्रियनच्या अंगावर वीज पडली आणि तो बेशुद्ध झाला. स्थानिक मच्छीमारानी तात्काळ मीरा रोडच्या वोकार्ड रुग्णालयात त्याला दाखल केले. मात्र सुप्रियनचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरानी स्पष्ट केले. याप्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे, अशी माहिती पोलीस निरीक्षक सतीश निकम यांनी ईटीव्ही भारतला दिली.

ABOUT THE AUTHOR

...view details