ठाणे- उल्हासनगरमध्ये एका बावीस वर्षीय तरुणावर गोळीबार झाल्याची घटना समोर आली आहे. कुर्ला कॅम्प परिसरातील पाण्याच्या टाकीनजिक असलेल्या मूकबधीर शाळेच्या मैदानात सोमवारी रात्री ही घटना घडली. भरत लष्कर या तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.
उल्हासनगरात गोळीबार, 22 वर्षीय तरुणाचा मृत्यू - ठाण्यात गोळीबारात तरुणाचा मृत्यू
उल्हासनगरमध्ये एका बावीस वर्षीय तरुणावर गोळीबार झाल्याची घटना समोर आली आहे. कुर्ला कॅम्प परिसरातील पाण्याच्या टाकीनजिक असलेल्या मूकबधीर शाळेच्या मैदानात सोमवारी रात्री ही घटना घडली. भरत लष्कर या तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.
उल्हासनगरात गोळीबार
गोळीबाराचे कारण अद्यापही समोर आले नाही. पोलीस आरोपींचा शोध घेत आहे, तर दुसरीकडे मृताच्या नातेवाईकांचीही याप्रकरणी चौकशी करण्यात येत आहे. याप्रकरणी विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात अभिजीत बोडके, कृष्णा कुंभार, उदय भाटकर आणि सलीम या चौघांविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस पुढील तपास करत आहे.
Last Updated : Nov 5, 2019, 12:46 PM IST