महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

पिळदार शरीराची हाव पडली महागात; कृत्रिम आहारामुळे कुर्ल्यातील युवकाच्या दोन्ही किडन्या निकामी

श्रीदीप मुंबईतील रिलायन्स हरिकीसनदास रुग्णालयात उपचार घेत आहे. श्रीदीपने आंतरराष्ट्रीय दर्जाच्या शरीरसौष्ठव स्पर्धेत अनेक नामांकने मिळवली आहेत. तो आपल्या आहारावरदेखील विशेष लक्ष देत होता. तो कृत्रिम पोषक आहार घ्यायचा मात्र त्याने काही कारणास्तव तो बंद केला. कालांतराने पुन्हा सुरू केला असता श्रीदीपला त्रास होऊ लागला. त्याचा रक्तदाब अनियंत्रित झाला. त्याला उलट्या झाल्याने त्याने डॉक्टरांचा सल्ला घेतला. यावेळी  रक्तदाब अनियंत्रणामुळे त्याच्या दोन्ही किडन्या खराब झाल्याचे समोर आले.

By

Published : Jan 14, 2020, 12:52 AM IST

श्रीदीप गावडे
श्रीदीप गावडे

मुंबई - पिळदार शरीर बनवण्याच्या नादात कृत्रिम आहार घेतल्याने कुर्ल्यातील एका तरूणाच्या दोन्ही किडन्या निकामी झाल्या आहेत. श्रीदीप गावडे, असे या तरूणाचे नाव आहे. श्रीदीप शरीरसौष्ठवपटू होता. श्रीदीपच्या आईने किडनी देऊन त्याचे प्राण वाचवले आहेत. प्रोटीन्सच्या गोळ्यांच्या अतिसेवनाने श्रीदीपवर ही परिस्थिती ओढवली आहे.

कृत्रिम आहारामुळे कुर्ल्यातील युवकाच्या दोन्ही किडन्या निकामी

श्रीदीप मुंबईतील रिलायन्स हरिकीसनदास रुग्णालयात उपचार घेत आहे. श्रीदीपने आंतरराष्ट्रीय दर्जाच्या शरीरसौष्ठव स्पर्धेत अनेक नामांकने मिळवली आहेत. तो आपल्या आहारावरदेखील विशेष लक्ष देत होता. तो कृत्रिम पोषक आहार घ्यायचा मात्र त्याने काही कारणास्तव तो बंद केला. कालांतराने पुन्हा सुरू केला असता श्रीदीपला त्रास होऊ लागला. त्याचा रक्तदाब अनियंत्रित झाला. त्याला उलट्या झाल्याने त्याने डॉक्टरांचा सल्ला घेतला. यावेळी रक्तदाब अनियंत्रणामुळे त्याच्या दोन्ही किडन्या खराब झाल्याचे समोर आले.

हेही वाचा -अलिबागची बालकलाकार आर्या मोरे 'सावित्रीजोती' मालिकेत साकारतेय 'ही' भूमिका

पिळदार व मजबूत शरीर बनवण्यासाठी अनेकजण तासंतास व्यायाम करतात आणि कृत्रिम आहार घेतात. त्याच्या शरीरावरील दुष्परिणामांकडे मात्र दुर्लक्ष करतात. बाजारात उपलब्ध असलेले कृत्रिम प्रोटीन अतिप्रमाणात घेतल्यास किडनीवर ताण येतो. त्यामुळे किडनीचे कार्य मंदावते आणि काही काळानंतर बंद होते. त्यामुळे कृत्रिम प्रोटीन घेताना डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details