ठाणेThane Terrorist Attack : ठाण्यातील सिनेगॉग चौकात असलेल्या ज्यू धर्मीयांच्या प्रार्थना स्थळी बॉम्ब ठेवल्याची धमकी आल्याने, प्रचंड खळबळ उडाली आहे. हमास आणि पॅलेस्टाईन युद्धाच्या पार्श्वभूमीवर या धमकीला अत्यंत गांभिर्यानं घेत ठाणे पोलिसांनी (Thane Police) या परिसराला संपूर्णतः सील केलं आहे. प्रार्थना स्थळ प्रशासनाला आलेल्या ई-मेलद्वारे आलेल्या धमकीमुळे येथे प्रचंड तणावाचं वातावरण पसरलं आहे.
बॉम्बशोधक पथकाने सुरू केले शोधकार्य: पॅलेस्टाईनमधील दहशतवादी संघटना हमासने इस्रायलवर (Israel Palestine War) केलेल्या भीषण हल्ल्यानंतर संपूर्ण जगातील ज्यू धर्मियांच्या धार्मिक स्थळांना संरक्षण देण्यात आलं आहे. ठाण्यातील ज्यू धर्मीयांच्या धार्मिक स्थळ सिनगॉगला आज एका ईमेलद्वारे बॉम्ब ठेवल्याची धमकी आल्याने, ठाण्यात प्रचंड खळबळ उडाली. सिनेगॉग प्रशासनाला आलेल्या या धमकीच्या ईमेलनंतर ठाण्यातील पोलीस यंत्रणा सतर्क झाली आहे. ईमेलद्वारे आलेल्या धमकीनंतर संपूर्ण परिसर पोलिसांनी सील केला आहे. आंबेडकर रोड सिव्हिल हॉस्पिटल या परिसरातील संपूर्ण वाहतूक बंद करण्यात आली आहे. ठाणे पोलिसांनी येथे प्रचंड बंदोबस्त लावून सर्च ऑपरेशन सुरू केलं आहे. सिनेगॉग परिसरात बॉम्बशोधक पथकाने संपूर्ण इमारतीत शोधकार्य सुरू केलं आहे.