महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Bollywood Theme Park: करोडो रुपयांचे बॉलीवूड पार्क गेला कुठे ? स्थानिक युवकांचा खेळ बंद केला कोणी; स्थानिकांचा सवाल - MLA Pratap Sarnaik

Bollywood Theme Park: बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे आमदार प्रताप सरनाईक यांच्या संकल्पनेतून ठाण्यातील वर्तक नगर भागात करोडो रुपये खर्च करुन, अर्धवट साकारण्यात आलेलं आणि न्यायालयात अडकलेल्या बॉलिवूड थीम पार्कची आता दुरावस्था झाली

Bollywood Theme Park
Bollywood Theme Park

By

Published : Nov 25, 2022, 9:43 AM IST

ठाणे:बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे आमदार प्रताप सरनाईक MLA Pratap Sarnaik यांच्या संकल्पनेतून ठाण्यातील वर्तक नगर भागात करोडो रुपये खर्च करुन, अर्धवट साकारण्यात आलेलं आणि न्यायालयात अडकलेल्या बॉलिवूड थीम पार्कची आता दुरावस्था झाली आहे. त्यातच चरसी गर्दूल्यांचा हा अड्डा सुद्धा झालेला पाहायला मिळत आहे. प्रताप सरनाईक यांच्या संकल्पनेतून 2014 रोजी ठाण्यातील वर्तकनगर भागात करोडो रुपये खर्च करुन बॉलिवूड थीम पार्क साकरण्यात आले आहे.

करोडो रुपयांचे बॉलीवूड पार्क गेला कुठे ? स्थानिकांचा सवाल

स्थानिकांमध्ये संतापाचे वातावरण: मात्र सुरुवातीपासूनच हे थीम पार्क वादाच्या भवऱ्यात अडकल्याने सध्या हा वाद न्यायालयालयात आहे. त्यामुळे गेल्या कित्येक वर्ष या थीम पार्कची दुरावस्था झालेली आहे. आणि याचाच फायदा आसपासच्या चरसी, गर्दूल्ले आणि बेवड्यांनी घेतलेला पाहायला मिळतोय. या थीम पार्कमध्ये सरासपणे या गर्दूल्यांचा वावर वाढत असल्याने स्थानिकांमध्ये संतापाचे वातावरण पाहायला मिळतंय.


हॉलिबॉल पोल अनधिकृत असल्याची माहिती: विशेष म्हणजे या पार्कचा दुरोपयोग होत असतांना या पार्कला लागलेला गर्दूल्यांचा विळखा रोखण्यासाठी स्थानिक तरुणांनी पुढाकार घेत याठिकाणी हॉलिबॉलचा नेट सराव सुरु केला. मात्र ठाणे महापालिकेने सरावासाठी लावण्यात आलेले हॉलिबॉल पोल अनधिकृत असल्याच सांगत काढून टाकले. त्यामुळे या स्थानिक सुशिक्षित तरुणांमध्ये एकीकडे ठाण्यामध्ये अनेक अनधिकृत बांधकाम होत असतांना महापालिका प्रशासनाला आम्ही सरावासाठी लावलेले पोलच अनधिकृत दिसले, पण महापालिकेने हा पार्क चरसी गर्दुल्ल्यांना अंधन दिलय का ? असा सवाल आता स्थानिक नागरिक विचारत आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details