ठाणे Bogus Call Centre Vashi : नवी मुंबई पोलिसांनी वाशी भागातील एका मॉलमधून बनावट कॉल सेंटरचा पर्दाफाश केला आहे. या प्रकरणी पोलिसांनी २३ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला. या २३ लोकांमध्ये बनावट कॉल सेंटरचा मालक आणि व्यवस्थापकाचाही समावेश आहे. एका पोलीस अधिकाऱ्यानं रविवारी ही माहिती दिली. आरोपींनी स्वत:ला अमेरिकन कंपन्यांचे प्रतिनिधी सांगितलं होतं. त्यांनी लोकांना व्हायग्रा आणि सियालिस सारखी औषधं विकली होती.
अमेरिकन नागरिकांची फसवणूक केली : वाशी पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्यानं सांगितलं की, आरोपींनी अमेरिकन नागरिकांचं क्रेडिट आणि डेबिट कार्डचा तपशील मिळवून त्यांची फसवणूक केली. त्यांनी सांगितलं की, शनिवारी केलेल्या छापेमारीत ३.९७ लाख रुपये किमतीच्या हार्डडिस्क आणि इलेक्ट्रिकल उपकरणांसह अनेक गॅजेट्स जप्त करण्यात आले. आरोपींनी vcdial/Nextiva सॉफ्टवेअर वापरून आउटबाउंड कॉल केले. त्यांनी गेटवे बायपास आणि VoIP द्वारे देखील कॉल केले होते.
पोलिसांनी रंगेहाथ पकडलं : संपूर्ण प्रकरणाची माहिती देताना अधिकारी म्हणाले की, आम्ही आरोपींना फसवणूक करताना रंगेहाथ पकडलं. कॉल सेंटरच्या मालकावर आरोप आहे की त्यानं मुंबईतील मालाड येथे राहणाऱ्या एका व्यक्तीकडून अमेरिकेन लोकांचा डेटा खरेदी केला. त्यानंतर त्याने आपल्या कर्मचाऱ्यांकडून औषधे विकण्याच्या नावाखाली अमेरिकन नागरिकांची फिशिंग करण्यास सुरुवात केली. या कॉल सेंटरचे कर्मचारी ओळख लपवून किंवा चुकीची माहिती देऊन कॉल करत असत.
या आधीही बनावट कॉल सेंटरचा पर्दाफाश केला होता :अधिकाऱ्यानं सांगितलं की, औषधांच्या विक्रीतून मिळालेली रक्कम खारघर परिसरातील एका बँकेच्या शाखेत एका भारतीय कंपनीच्या खात्यात जमा करण्यात आली. विशेष म्हणजे, शनिवारी नवी मुंबई पोलिसांनी नेरूळ परिसरातील एका मॉलमधून अशाच एका बनावट कॉल सेंटरचा पर्दाफाश केला होता. या प्रकरणी १३ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता.
हेही वाचा :
- Online Gaming Fraud Case : ऑनलाइन गेमिंग फसवणूक प्रकरण; आरोपी सोंटू जैनने उघडले होते आणखी तीन लॉकर
- Nashik Crime : ड्रग्ज प्रकरणातील मुंबई पोलिसांच्या कारवाईनंतर पोलिसांना जाग, १३ कॉफी शॉपला ठोकलं टाळं
- Telangana Assembly Election : मतदानापूर्वी तेलंगणात १०० कोटी रुपयांहून अधिकचा मुद्देमाल जप्त