महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

ठाण्यात शरीरसौष्ठव स्पर्धा उत्साहात पडली पार - bodybuilder competition in thane

क्रिकेट व इतर खेळाप्रमाणे या स्पर्धेकडे देखील शासनाने एक वेगळा 'स्टेज' उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी यावेळी शरीरसौष्ठवपटूंनी केली. तसेच मुलांनी स्टेरॉइड सेवन न करता आपल्या जेवणात सकस आहार घ्यावा, असा सल्लाही त्यांनी दिला.

bodybuilder competition in thane
ठाण्यात शरीरसौष्ठव स्पर्धा उत्साहात पडली पार

By

Published : Feb 6, 2020, 7:48 PM IST

Updated : Feb 6, 2020, 8:02 PM IST

ठाणे- दिवा विकास प्रतिष्ठानच्यावतीने ठाण्यात शरीरसौष्ठव स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत दिवा तसेच ठाणे जिल्ह्यातील स्पर्धकांनी सहभाग नोंदवला होता. गाण्याच्या ठेक्यावर शरीरसौष्ठव स्पर्धकांनी पोज देत प्रेक्षकांची मने जिंकली. या स्पर्धेत लाखो रुपयांचे पारितोषिके ठेवण्यात आली होती.

ठाण्याच्या शरीरसौष्ठव स्पर्धेतील दृश्य....

क्रिकेट व इतर खेळाप्रमाणे या स्पर्धेकडे देखील शासनाने एक वेगळा 'स्टेज' उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी यावेळी शरीरसौष्ठवपटूंनी केली. तसेच मुलांनी स्टेरॉइड सेवन न करता आपल्या जेवणात सकस आहार घ्यावा, असा सल्लाही त्यांनी दिला. दरम्यान, काही दिवसांपूर्वीच मुंब्र्यामध्ये नावेद खान नावाच्या शरीरसौष्ठवपटूचा स्टेरॉईडच्या अतिसेवनाने मृत्यू झाला होता.

Last Updated : Feb 6, 2020, 8:02 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details