ठाणे : तरुणाच्या फाशीमुळे शहरात खळबळ उडाली आहे. विठ्ठल मिसाळ असे मृतदेह आढळून आलेल्या तरुणाचे नाव आहे. तो बीड जिल्ह्यातील रहिवासी आहे. मध्य रेल्वेच्या मार्गावरील कल्याण रेल्वे जक्शन आहे. या स्टेशनवरून देशभरात मेल एक्स्प्रेस या लांबपल्ल्याच्या रेल्वेसह लोकलने प्रवास करणारे सुमारे तीन लाखाहून अधिक प्रवाशी २४ तास प्रवास करतात. यामुळे कल्याण रेल्वे परिसर दिवसरात्र नागरिकांनी गजबलेला असतो.
५० ते ६० फूट उंचावर गळफास :स्टेशन समोर प्रवाशांना जाण्यासाठी स्कायवॉक उभारला आहे. आज पहाटेच्या सुमारास स्कायवॉकच्या खालच्या बाजूने म्हणजे जमिनीपासून ५० ते ६० फूट उंचावर एक तरुण गळफास घेतलेल्या अवस्थेत काही नागरिकांनी पाहिले. त्यापैकी काही नागरिकांनी या घटनेचा व्हिडिओ काढला. तर दुसरीकडे या घटनेची माहिती महात्मा फुले चौक पोलिसांना मिळताच पोलिसांचे एक पथक घटनास्थळी दाखल होऊन पंचनामा केला. त्यानंतर अग्निशमन दलाच्या जवानांच्या मदतीने तरुणाचा मृतदेह खाली उतरवून शवविच्छेदनासाठी कल्याण डोंबिवली महापालिकेच्या बाई रुक्मिणी रुग्णालयात पाठवला आहे.