ठाणे : पोलीस सूत्राने दिलेल्या माहितीनुसार मृत शहाजहान ही विवाहित होती; (woman body found in lodge) मात्र विवाह झाल्यानंतर ती नवऱ्याला सोडून प्रियकरासोबत गेल्या अनेक वर्षांपासून लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत होती. परंतु, हे दोघे कुठे राहत होते याचा ठावठिकाणा कोणालाच माहीत नव्हता. (Live in relationship) त्यातच अंबरनाथमधील शिवाजी चौक परिसरात असलेल्या लॉजमध्ये मृत महिला आणि तिचा प्रियकर राहत असल्याची माहिती मृतक महिलेच्या पतीला आणि मृतकच्या बहिणीला मिळाली होती.
महिला मृतावस्थेत आढळली :शुक्रवारी महिलेचा पती आणि तिची बहीण यांना संशय आल्याने ते या लॉजवर पोहोचले. तेव्हा त्यांनी लॉजमध्ये विचारणा केली असता, लॉजच्या रजिस्टर बुकमध्ये महिलेचे नाव दिसले. तेव्हा ही महिला राहत असलेल्या चौथ्या मजल्याच्या रूमचा दरवाजा लॉज चालकाने ठोकला असता आतून कोणताच प्रतिसाद आला नाही. त्यामुळे लॉज चालकाने याबाबत पोलिसांना माहिती दिली. या लॉज चालकाने दुसऱ्या चावीने सदर रूम उघडल्यानंतर महिला मृतावस्थेत पोलिसांना आढळली होती.
प्रियकर एक दिवसाआधीच झाला फरार :ठाणे जिल्ह्यातील मिरा रोड येथे राहत असल्याचा पुरावा मृतक महिलेसह तिच्या प्रियकराने लॉज चालकाला दाखविला होता. ते दोघेही २४ जूनपासून साईलीला हॉटेलमध्ये राहत होते; मात्र शुक्रवारी सकाळी हॉटेलच्या एका खोलीमध्ये एक महिला मृतावस्थेत आढळल्याची माहिती शिवाजीनगर पोलिसांना देण्यात आली होती. परंतु, या महिलेसोबत लिव्ह इनमध्ये राहणारा तिचा प्रियकर एक दिवसांपूर्वीच लॉजमधून फरार झाल्याची माहिती पोलिसांना घटनास्थळी मिळाली होती. पोलिसांनी लॉजच्या रूममधील घटनास्थळी पंचनामा करत महिलेचा मृतदेह उल्हासनगर मध्यवर्ती रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवला.
फरार प्रियकराचा शोध सुरू:सदर महिलेचा मृत्यू आजाराने झाल्याचे शवविच्छेदनात नमूद करण्यात आल्याची माहिती शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक भगत यांनी दिली; मात्र व्हिसेरा रिपोर्ट आल्यानंतर मृत्यूबाबत आणखी स्पष्टता येईल, असेही त्यांनी सांगितले. पोलीस या महिलेच्या प्रियकराचा शोध घेत आहेत. त्याने जो पत्ता लॉज चालकाला रजिस्टर बुकमध्ये दिला होता. त्या पत्तावर पोलिसांनी जाऊन तपास केला असता त्या पत्तावर तो राहत नसल्याचे समोर आले. वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक भगत यांनी ही माहिती दिली आहे.
हेही वाचा:
- Bihar Man Lick Spit : बिहार पोलिसांचे लाजिरवाणे कृत्य, तरुणाला मारहाण करत थुंकी चाटायला लावली ; हे आहे कारण
- Minor Girl Death Case: अनैसर्गिक कृत्यामुळे अल्पवयीन मुलीचा मृत्यू; सव्वाचार वर्षानंतर ‘डीएनए’मुळे गुन्हा उघड
- Fake Bank Employee Arrested: बँक कर्मचारी असल्याचे भासवत ग्राहकांना लुटले, 49 गुन्हे करणाऱ्यांना अटक