महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

नववर्षाच्या स्वागतासाठी भिवंडीत शिक्षक संघटनेचे रक्तदान शिबीर - blood donation news

साने गुरुजी समाजसेवी शिक्षक संघ १९ वर्षांपासून रक्तदान शिबीर हा आगळावेगळा उपक्रम राबवत आहे.

blood donation
नववर्षाच्या स्वागतासाठी भिवंडीत शिक्षक संघटनेचे रक्तदान शिबीर

By

Published : Jan 1, 2020, 12:56 PM IST

ठाणे- सरत्या वर्षाला निरोप देऊन नववर्षाचे स्वागत सर्वत्र जल्लोषात करण्यात आले आहे. भिवंडी तालुक्यातील साने गुरुजी समाजसेवी शिक्षक संघ या जिल्हा परिषद शिक्षका संघटनेच्या माध्यमातून पडघा येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

नववर्षाच्या स्वागतासाठी भिवंडीत शिक्षक संघटनेचे रक्तदान शिबीर

हेही वाचा -नववर्षाचे उत्साहात स्वागत; नवी मुंबईकरांचा जल्लोष

साने गुरुजी समाजसेवी शिक्षक संघ १९ वर्षांपासून हा आगळावेगळा उपक्रम राबवत आहे. यामध्ये तालुक्यातील अनेक युवक, नागरिक रक्तदान करण्यासाठी हजेरी लावत असतात. साने गुरुजी समाजसेवी शिक्षक संघाचे अध्यक्ष प्रशांत भोसले, कार्याध्यक्ष संतोष जोशी, पदाधिकारी अशोक ठाणगे, ज्ञानेश्वर काठे, विकास सपाटकर, गणेश गायकवाड, प्रशांत घागस, रवींद्र जाधव आदी सहकाऱ्यांनी हा उपक्रम सुरु केला आहे.

या रक्तदान शिबिरास हातमाग महामंडळाचे अध्यक्ष प्रकाश पाटील, आमदार शांताराम मोरे, पंचायत समिती सदस्य गुरुनाथ जाधव आदी मान्यवरांनी भेट देऊन उपक्रमाचे कौतुक केले. या शिबिरात १३० युवकांनी रक्तदान करून सामाजिक जबाबदारी पार पाडली.

ABOUT THE AUTHOR

...view details