ठाणे -कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात नववर्ष साजरा होत आहे. यात गर्दी होऊन कोरोनाचा संसर्ग वाढू नये, वाहतुकीचा खोळंबा होऊ नये, तसेच तळीरामांवर कारवाई करण्यासाठी संपूर्ण मुंबईसह मीरा-भाईंदर, वसई-विरार पोलिसांनी कंबर कसली आहे. पोलिसांनी संपूर्ण शहरातील प्रमुख नाक्यांवर तपासणी केंद्रे तयार केली आहेत.
भाईंदर, विरार क्षेत्रातील २२ ठिकाणी नाकाबंदी; चौपाटींवर पोलिसांची नजर
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात नववर्ष साजरा होत आहे. यात गर्दी होऊन कोरोनाचा संसर्ग वाढू नये, वाहतुकीचा खोळंबा होऊ नये, तसेच तळीरामांवर कारवाई करण्यासाठी संपूर्ण मुंबईसह मीरा-भाईंदर, वसई-विरार पोलिसांनी कंबर कसली आहे.
मीरा-भाईंदर, वसई-विरार क्षेत्रातील २२ ठिकाणी नाकाबंदी असणार आहे. प्रामुख्याने वसई-विरार, मीरा-भाईंदर मधील चौपाटींवर पोलिसांची करडी नजर असणार आहे. यासाठी पोलिसांचे विशेष पथक नेमण्यात आले आहे. हॉटेल आणि रेस्टॉरंट्सना रात्री ११ वाजेपर्यंत परवानगी देण्यात आली आहे. तसेच, जमावबंदी लागू असल्याने पाचपेक्षा अधिक नागरिक एकत्र दिसल्यास त्यांच्यावर पोलीस कारवाई करणार आहे. नागरिकांनी घरात रहावे आणि कुटुंबातील सदस्यांसोबत घरातच नववर्ष साजरा करावा, असे आवाहन मीरा-भाईंदर, वसई-विरार परिमंडळ-२ चे उपायुक्त संजय कुमार पाटील यांनी केले.
हेही वाचा -उंबार्ली टेकडीवर सरत्या वर्षाला निरोप देणाऱ्यांवर पर्यावरणप्रेमींची करडी नजर