ठाणे- सरकारने रोजगार आणि हक्काचा निवारा द्यावा, या आणि अन्य मागण्यांच्या पूर्ततेसाठी अंबरनाथ तालुक्यातील अंध बांधवानी तहसीलदार कार्यालयावर मोर्चा धाडला. यावेळी अंध बांधवांनी निदर्शने करून सरकारचे लक्ष वेधून घेतले.
अंध बांधवांचा अंबरनाथ तहसील कार्यलयावर धडक मोर्चा, रोजगारासह निवाऱ्याची मागणी - Ambernath Tehsil Office
लॉकडाऊनमुळे सध्या लोकलमधून प्रवास करण्यावर सर्वसामान्यांवर निर्बंध असल्याने लोकल प्रवास करणे दुरापास्त झाले आहे. त्यामुळे, लॉकडाऊनच्या काळामध्ये अंध बांधवांवर आर्थिक संकट कोसळले आहे. भाडे तत्वावरील घरांमध्ये राहत असल्याने त्यांना घरभाडे देणेही कठि झाले आहे.
![अंध बांधवांचा अंबरनाथ तहसील कार्यलयावर धडक मोर्चा, रोजगारासह निवाऱ्याची मागणी अंबरनाथ तहसील कार्यलयावर धडक मोर्चा](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-9188642-thumbnail-3x2-b.jpg)
नॅशनल फेडरेशन ऑफ व्हिज्युअल इमपॅड परसन्स संघटनेच्या माध्यमातून झालेल्या या आंदोलनात मोठ्या संख्येने अंध बांधव उपस्थित होते. रेल्वेमध्ये विविध वस्तूंची विक्री करून अंध बांधवांचा उदरनिर्वाह सुरू असतो. मात्र, लॉकडाऊनमुळे सध्या लोकलमधून प्रवास करण्यावर सर्वसामान्यांवर निर्बंध असल्याने लोकल प्रवास करणे दुरापास्त झाले आहे. त्यामुळे, लॉकडाऊनच्या काळामध्ये अंध बांधवांवर आर्थिक संकट कोसळले आहे. भाडे तत्वावरील घरांमध्ये रहात असल्याने त्यांना घरभाडे देणेही कठीन झाले आहे. सामाजिक न्याय केंद्रामार्फत रोजगार केंद्रांची निर्मिती करून दरमहा रोजगार मिळावा आणि हक्काचे घर द्यावे, या मागणीचे निवेदन संघटनेच्या वतीने तहसीलदारांना देण्यात आले.