महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Grampanchayat Election Result 2022 : मुख्यमंत्र्यांच्या जिल्ह्यात भाजपचे वर्चस्व; ४२ पैकी २० ग्रापंपचायतीवर भाजपाचा झेंडा - ग्रामपंचायत निवडणूकीच्या अंतिम निकाल ठाणे

ग्रामपंचायत निवडणूकीच्या अंतिम निकालात ठाणे जिल्ह्यातील ( Gram Panchayat Elections Result in Thane ) सर्वाधिक 42 ग्रामपंचायतींपैकी 20 ठिकाणी भाजपाचे पॅनल निवडून ( BJP win on 20 out of 42 Gram Panchayats ) आले. तर शिंदे गटाचे 13 पॅनल तसेच ठाकरे गटाचे 5 तर 2 ठिकाणी अपक्ष सरपंच निवडून आल्याने मुख्यमंत्र्यांच्या जिल्ह्यात भाजपाने प्रथम क्रमांक पटकावला आहे.

Grampanchayat Election Result
ग्रामपंचायत निवडणूक निकाल ठाणे

By

Published : Dec 20, 2022, 5:54 PM IST

ठाणे :राज्यात आज ग्रामपंचायत निवडणूक निकालांचा ( Gram Panchayat Elections Result ) घमाशान सुरू आहे. ठाणे जिल्ह्यातील थेट सरपंच पदासाठी 34 ग्रामपंचायतीमध्ये 114 उमेदवारांसह 219 सदस्यांच्या जागांसाठी 613 उमेदवारांच्या अंतिम निकालात भाजपाचे वर्चस्व राहिले आहे. विशेष म्हणजे 42 पैकी 6 ग्रामपंचाती बिनविरोध झाल्या, तर दोन ठिकाणी सरपंच पदासाठी उमेदवारांनी अर्ज दाखल न केल्या रिक्त आहेत. आज अंतिम निकालात सर्वाधिक 20 ठिकाणी भाजपाचे पॅनल ( BJP win on 20 out of 42 Gram Panchayats ) निवडून आले. तर शिंदे गटाचे 13 पॅनल, तसेच ठाकरे गटाचे 5 तर 2 ठिकाणी अपक्ष सरपंच निवडून आल्याने मुख्यमंत्र्यांच्या जिल्ह्यात भाजपाने प्रथम क्रमांक पटकावला आहे.

ठाणे जिल्ह्यातील निकाल : जिल्ह्यातील 42 ग्रामपंचायती पैकी 6 ग्रामपंचायतींचे सदस्य व सरपंच बिनविरोध विजयी झाले आहेत. तर शहापूर तालुक्यातील नांदवळ आणि लवले या 2 ग्रामपंचायीतमध्ये उमेदवारी अर्ज दाखल झाले नसल्याने 34 सरपंच पदासाठी मतदान पार पडले होते. भिवंडी तालुक्यात सर्वाधिक 13 ग्रामपंचायतींच्या अंतिम निकालात भाजप 8, शिंदे गट 4 , ठाकरे गट 1 तर एक ठिकाणी अपक्ष सरपंच निवडून आला. तसेच भाजपचे आमदार असलेल्या मुरबाडला 14 ग्रापंचायत निवडणुकीत 3 बिनविरोध झाल्याने 11 ग्रामपंचायतींच्या अंतिम निकालात 9 जागेवर भाजप, 5 जागेवर शिंदे गटाला समाधान मानावे लागले.

पोलिसांचा चोख बंदोबस्त : कल्याण तालुक्यात 9 ग्रापंचायतीपैकी 1 बिनविरोध झाल्याने 8 ग्रामपंचायतींच्या अंतिम निकालात ठाकरे - शिंदे गटाला प्रत्येकी 3 अशा समान जागा मिळाल्या तर 2 ठिकाणी भाजपाने बाजी मारली आहे. तर शहापूर तालुक्यातील दोन ठिकाणी उमेदवारी अर्ज दाखल न झाल्याने त्या ठिकाणी सरपंचपद रिक्त असून एक ग्रामपंचायत बिनविरोध झाली. त्यामुळे तीन ग्रामपंचायतींच्या अंतिम निकालात 1 भाजप ठाकरे व शिंदे गटाचा प्रत्येकी एक सरपंच निवडून आला आहे. दरम्यान, जिल्ह्यातील सर्वच मतमोजणी केंद्रावर पोलिसांचा मोठा बंदबोस्त तैनात करण्यात आला होता. त्यामुळे मतदानाप्रमाणे मत मोजणीही शांतते पार पडली आहे.

केंद्रीय राज्यमंत्र्यांचा दबदबा : जिल्ह्याचे लक्ष लागून असलेल्या भिवंडी तालुक्यातील कोनगाव ग्रामपंचायतीच्या अंतिम निकालात केंद्रीय पंचायती राज राज्यमंत्री कपिल पाटील यांच्या पॅनलने बाजी मारली आहे. विशेष म्हणजे मंत्री पाटील यांनी जिल्ह्याच्या राजकारणात याच जिल्हा परिषद कोन गटातून सुरूवात करून निवडून आल्यानंतर जिल्हा परिषदचे अध्यक्ष पद भूषवले होते. आणि त्यानंतर त्यांचा ठाणे जिल्ह्यात राजकीय दबदबा निर्माण झाला. यामुळे केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांचे वर्चस्व असलेली ग्रामपंचायत ओळखली जात असताना मंत्री पाटील यांनी सरपंच डॉ. रुपाली कराळे यांना डावलून रेखा पाटील यांना पाठींबा दिला. त्याचाच फायदा मंत्री पाटील यांचे कट्टर विरोधात सुरेश म्हात्रे उर्फ बाळ्या मामा यांनी बाळासाहेबांची शिवसेना एकनाथ शिंदे गटाच्या माध्यमातून भाजपाने डावललेल्या उमेदवार डॉ. रुपाली कराळे यांच्या सोबत हातमिळवणी करून या ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपाला कडवे आव्हान दिले होते. मात्र अटीतटीच्या लढतीत केंद्रीय राज्यमंत्री पाटील यांचे पॅनल निवडून आले.

ABOUT THE AUTHOR

...view details