महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

कल्याणमध्ये भाजप-शिवसेनेच्या इच्छुकांची बंडखोरी, जोरदार शक्तिप्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल - भाजपचे आमदार गणपत गायकवाड

विधानसभा निवडणुकीत ठाणे जिल्ह्यात राजकीय भूकंप होणार आहे. कल्याणमध्ये भाजप आणि शिवसेनेच्या इच्छुकांनी बंडखोरी करत जोरदार शक्तीप्रदर्शन केले. त्यांनी शुक्रवारी शेवटच्या दिवशी उमेदवारी अर्ज दाखल केले.

भाजप - शिवसेना बंडखोर उमेदवारांचे जोरदार शक्तिप्रदर्शन

By

Published : Oct 5, 2019, 8:47 AM IST

ठाणे - विधानसभा निवडणुकीत ठाणे जिल्ह्यात राजकीय भूकंप होणार आहे. कल्याणमध्ये भाजप आणि शिवसेनेच्या इच्छुकांनी बंडखोरी करत जोरदार शक्तीप्रदर्शन केले. त्यांनी शुक्रवारी शेवटच्या दिवशी उमेदवारी अर्ज दाखल केले.

कल्याण पश्चिम विधानसभा मतदारसंघातील भाजपचे विद्यमान आमदार नरेंद्र पवार यांचा पत्ता कट झाल्याने त्यांनी शिवसेना - भाजप युतीचे उमेदवार विश्वनाथ भोईर यांच्या विरोधात बंडखोरी केली आहे. त्यांनी ५ हजाराहून अधिक कार्यकर्त्यांची रॅली काढत कल्याणच्या प्रांत कार्यलयात उमेदवारी अर्ज दाखल केला. विशेष म्हणजे रॅलीत भाजपचे व रिपाईचे झेंडे कार्यकर्त्यांच्या हातात पाहायला मिळाले. तर मनसेचे माजी आमदार प्रकाश भोईर यांनीही उमेदवारी अर्ज दाखल केल्याने या मतदारसंघात तिरंगी लढत होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. आमदार पवार यांनी एक भाजपच्या वतीने तर दुसरा अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला.

कल्याणमध्ये भाजप - शिवसेना बंडखोर उमेदवारांचे जोरदार शक्तिप्रदर्शन

कल्याण पूर्व विधानसभा मतदारसंघ भाजपच्या वाट्याला गेल्याने उल्हासनगर महापालिकेतील शिवसेनेचे नगरसेवक धनंजय बोडारे यांनीही भाजपचे आमदार गणपत गायकवाड यांच्या विरोधात बंडखोरी केली आहे. त्यांनी हजारो कार्यकर्त्यांचे शक्तीप्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल केला.

विशेष म्हणजे काल (शुक्रवार) भाजपचे आमदार गणपत गायकवाड यांनीही जोरदार शक्तीप्रदर्शन करून उमेदवारी अर्ज दाखल केला. मात्र, कल्याण पूर्व मतदारसंघातील शिवसेना नगरसेवकांसह शिवसैनिक रॅलीमध्ये सहभागी झाल्याचे दिसून आले नाही. उलट बंडखोर धनंजय बोडारे यांच्या रॅलीत मोठ्या संख्याने कल्याण - आणि उल्हासनगर पालिकेचे सेना नगरसेवक सहभागी झाल्याचे दिसून आले. आमदार गायकवाड हे शिवसेनेच्या उमेदवाराला पराभूत करून दोन वेळा अपक्ष आमदार म्हणून निवडून आले. तर यंदा मात्र, भाजपच्या कळपात सामील होत भाजपकडून उमेदवारी पदरात पाडून घेतली. त्यामुळे स्थानिक शिवसैनिक व पदाधिकाऱ्यांनी आमदाराला पराभूत करण्यासाठी चंग बांधल्याचे दिसून आले.

दरम्यान, कल्याण ग्रामीण विधानसभा मतदारसंघात शिवसेनेने अचानक उमेदवार बदलल्याने आज शिवसेनेच्या वतीने नगरसवेक रमेश म्हात्रे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. यामुळे आदी सेनेचे विद्यमान आमदार सुभाष भोईर यांना एबी फॉर्म दिला. मात्र, त्यांचा पत्ता कट झाल्याने ते बंडखोरीच्या पवित्र्यात असल्याचे बोलले जात आहे. असे झाले तर शिवसेना विरुद्ध बंडखोर शिवसेना असा सामना रंगणार आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details