महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Konkan Teacher Constituency Election : सत्तांतरानंतर भाजप शिंदे गट कोकण शिक्षक मतदार निवडणुकीसाठी सज्ज, निवडणुकीच्या मेळाव्यासाठी दिग्गजांची हजेरी - भाजप शिंदे गट

कोकण शिक्षक मतदार संघाची निवडणूक ३० जानेवारी रोजी आहे. कोकण शिक्षक आमदारकीच्या मेळाव्यासाठी भाजप, बाळासाहेबांची शिवसेना आणि आठवले गटाने शक्तीप्रदर्शन केले. या निवडणुकीसाठी भाजप आणि शिंदे गट सज्ज झाले आहेत.

CM Eknath Shinde
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

By

Published : Jan 22, 2023, 9:14 AM IST

प्रतिक्रिया देताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, दीपक केसरकर

ठाणे :राज्यात झालेल्या सत्तातरानंतर भाजप आणि शिंदे गट प्रथमच शिक्षक मतदार निवडणुकीला सामोरे जात आहे. राज्यात अनेक ठिकाणी शिक्षक मतदार निडवणुकीची रणधुमाळी बघायला मिळत आहे. कोकण शिक्षक मतदार निवडणुकीसाठी भाजप आणि शिंदे गटाचा मेळावा ठाण्यातील टीप टॉप प्लाझा येथे संपन्न झाला. यावेळी युतीची वज्रमूठ पाहायला मिळाली. या निवडणुकीसाठी भाजप आणि शिंदे गट सज्ज असून निवडणुकीसाठी हा मतदारसंघ युतीला काबीज करण्यासाठी पुन्हा संधी मिळाली असल्याने दोघांनी कंबर कसली आहे. या मेळाव्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय मंत्री रामदास आठवले, मंत्री रवींद्र चव्हाण, मंत्री दीपक केसरकर, आमदार किसन कथोरे, बालाजी किणीकर, निरंजन डावखरे, प्रताप सरनाईक, बाळासाहेबांच्या शिवसेनेचे नवी मुंबईचे नेते विजय चौघुले यांच्यासह कोकण शिक्षक मतदार संघ निवडणुकीचे युतीचे उमेदवार ज्ञानेश्वर म्हात्रे उपस्थित होते.

शिक्षक मतदार संघाची निवडणूक :कोकण शिक्षक मतदार संघाची निवडणूक येत्या ३० जानेवारी रोजी संपन्न होत आहे. या निवडणुकीत संपूर्ण कोकण मतदार संघातील जवळपास ३८ हजार शिक्षक मतदान करणार असून एक आमदार विधान परिषदेत निवडणूक जाणार आहे. या निवडणुकीला चांगलीच रंगत आली असून भारतीय जनता पार्टी व बाळासाहेबांची शिवसेना युतीचे अधिकृत उमेदवार ज्ञानेश्वर म्हात्रे आणि महाविकास आघाडीचे उमेदवार बाळाराम पाटील यांच्यात खरी लढत होणार आहे.

शिक्षक परिषदेचा बालेकिल्ला :कोकण विभाग शिक्षक मतदारसंघ हा भाजपप्रणीत शिक्षक परिषदेचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जात होता. शिक्षक परिषदेचे रामनाथ मोते सलग दोन वेळा याच मतदारसंघातून विजयी झाले होते. मात्र मागील निवडणुकीत मोते यांना डावलून शिक्षक परिषदेने वेणुनाथ कडू यांना उमेदवारी दिल्यामुळे नाराज मोते यांनी बंडखोरी केली. ही बंडखोरी शिक्षक परिषदेला भोवली आणि हा गड शेकापच्या बाळाराम पाटील यांनी सर केला होता. त्यामुळे पुन्हा हा मतदारसंघ आपल्याकडे काबीज करण्यासाठी युतीला संधी भाजप आणि शिंदे गटाने कंबर कसली आहे.

आठवलेंकडून उद्धव ठाकरेंना चिमटे :बाळासाहेबांच्या विचारानेच राज्यात अनेक वर्ष शिवशक्ती आणि भीमशक्ती एकत्र आले. मात्र मागील काही वर्षात उद्धव ठाकरे यांनी आमची साथ सोडली आणि होत्याचे नव्हते झाले. उद्धव ठाकरे यांनी माझे ऐकले नाही, माझे त्यांनी ऐकले असते तर त्यांच्यावर हि वेळ आलीच नसती, असे विधान केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी करत एकप्रकारे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली. तर कोकण मतदार निवडणुकीसाठी आम्ही सज्ज असून येणाऱ्या निवडणुकीत युतीचा उमेदवार ज्ञानेश्वर म्हात्रे याचा विजय होणार असल्याचा विश्वास व्यक्त केला. दरम्यान आठवले यांनी आपल्या नेहमीच्या शैलीत कवितेच्या माध्यमातून उपस्थितांची मने जिकली.

मुख्यमंत्र्यांना करावी लागली युतीची घोषणा :कोकण शिक्षक आमदारकीच्या टीपटॉपमधील मेळाव्यासाठी भाजप, बाळासाहेबांची शिवसेना आणि आठवले गटाने शक्तीप्रदर्शन केले. यावेळी मुख्यमंत्री भाषणाला उभे राहताच शिंदे गटाकडुन शिवसेनेचा जयजयकार सुरु झाला. त्याला प्रत्युत्तरादाखल भाजपनेही जय श्रीरामचे नारे देत सभागृह दणाणुन सोडले. ही जुगलबंदी सुरु असतानाच अखेर, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी, शिवसेना, भाजप रिपाई युतीचा विजय असो. अशी घोषणा देत बीकेसीला आपल्या या महायुतीची ताकद दाखवल्याचे नमुद केल्याने घोषणाबाजीचे द्वंदव शमले.


गाफील राहू नका :या मेळाव्यात कोकण विभागातील शिक्षक मोठया संख्येने उपस्थित होते. दरम्यान भाजप आणि शिंदे गटाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना जबाबदारी निश्चीत करण्यात आली. मतदारापर्यंत पोहचन्यासाठी आवाहन मंत्री रविंद्र चव्हाण यांनी केले. मागच्या वेळी झालेली चुका आता होता कमा नये, त्यामुळे या निवडणुकीत सतर्क राहावे असे आवाहन चव्हाण यांनी केले.

हेही वाचा : CM Eknath Shinde : छत्रपती संभाजी महाराज जयंती शासकीय कार्यालयात होणार साजरी ; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे मानले आभार

ABOUT THE AUTHOR

...view details