ठाणे - वाढीव वीजबिलाविरोधात भाजप पक्षाच्यावतीने ठाण्यातील महावितरणाच्या कार्यालयाबाहेर आंदोलने करण्यात आली. यावेळी महाविरतण कार्यालयाबाहेर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
ठाणे; वाढीव वीजबिलाविरोधात भाजप आक्रमक - भाजप आंदोलन ठाणे न्यूज
या आंदोलनाच्या वेळी काही नेते गंभीर असलेले दिसत होते. मात्र, काही कार्यकर्ते आंदोलनात हसताना मस्करी करताना आणि दिखाऊ आंदोलन करत असताना दिसले. या आंदोलनानंतर जवळपास ५० आंदोलन कार्यकर्त्यांना श्रीनगर पोलिसांनी ताब्यात घेतले.
![ठाणे; वाढीव वीजबिलाविरोधात भाजप आक्रमक ठाणे; वाढीव वीजबिलाविरोधात भाजप आक्रमक](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-10510741-770-10510741-1612522553921.jpg)
महावितरणाच्या कार्यालयाला टाळे ठोकण्याचा प्रयत्न
ठाण्याच्या वागळे इस्टेटमधील वितरण कार्यालयावर वाढीव वीजबिलाविरोधात भाजपच्यावतीने आंदोलन करण्यात आली. या आंदोलनादरम्यान काही भाजप कार्यकर्त्यांची पोलिसांशी बाचाबाची झाली. तर आक्रमक झालेल्या भाजप कार्यकर्त्यांनी महावितरणाच्या कार्यालयाला टाळे ठोकण्याचा प्रयत्न केला. आंदोलनादरम्यान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्याविरोधात घोषणा देण्यात आला.
आंदोलनात मस्करीच सुरू